अकोल्यातील काही कोचिंग क्लासेस होणार बंद...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

अग्नीशमन विभागाने या क्लासेसची झाडाझडती घेऊन संचालकांना सुरक्षेचे पुरेशे उपाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

अकोला - अग्नीशमन विभागाने या क्लासेसची झाडाझडती घेऊन संचालकांना सुरक्षेचे पुरेशे उपाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान २० कोचिंग क्लासेसमध्ये अग्नी सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करण्यात अाल्या. मात्र सूचना देऊनही उर्वरित कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी दखल घेतली नसल्याने त्यांना सात दिवसाचा अल्टिमेटम ३१ मे रोजी देण्यात अाला होता.

याची डेडलाईन अाता संपली असून, सोमवार (ता.१०) पासून कारवाईला सुरुवात होणार अाहे. उपाययोजना नसलेल्या इमारती पोलिस संरक्षणात सील केल्या जाणार अाहेत.मनपाच्या अग्नीशमन विभागाकडून माहिती घेतली असता अग्नीशमन विभागाने याअाधीच शहरातील ६४ कोचिंग क्लासेसच्या संचालकांना नोटीस बजावून अग्नी सुरक्षेच्या उपाययोजना करा, असे अादेश दिले होते.

मात्र, या अादेशाला क्लासेस संचालकांनी केराची टोपली दाखवली होती. तेव्हा शहरातही सुरत येथील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी ३१ मे रोजी या निगरगट्ट कोचिंग क्लासेसच्या संचालकांना सात दिवसाचा अल्टिमेटम देण्यात अाला होता. या दरम्यान किती कोचिंग क्लासेस संचालकानी अग्नी सुरक्षेच्या योजना केल्या याबाबत माहिती घेतली जात असून, अाजपासून कारवाईला सुरुवात होणार अाहे.

पोलिस संरक्षण अाणि अतिक्रमण विभागाची मदत
अग्निशमन विभागाने शहरातील ६४ कोचिंग क्लासेसच्या संचालकाना नोटीस बजाविल्या होत्या. त्यापैकी २० कोचिंग क्लासेसमध्ये उपाययोजना सुरू असल्याची माहिती देण्यात अाली अाहे. उपाययोजना वेळेत न केल्यास त्या इमारतीचा पाणी, वीज पुरवठा खंडीत करून इमारती सील करण्याची कारवाई करण्यात येणार अाहे. याकामी मनपाच्या अतिक्रमण विभागाचे सात ते अाठ कर्मचारी, अग्नीशमन विभागाचे दहा कर्मचारी, अाणि एक पोलिस उपनिरीक्षक, दोन हेड कॉन्स्टेबल, दहा शिपायांच्या संरक्षणात इमारती सील करण्यात येणार अाहेत.

ज्या इमारतीमध्ये अग्नी सुरक्षेच्या उपाय योजना दिसून अाल्या नाहीत अशाना नोटीस बजाविण्यात अाल्या होत्या. तर कमी मनुष्यबळामुळे कारवाईला विलंब लागत होता. अाता ही अडचणही सुटली असून, पोलिस संरक्षणात कारवाई केली जाणार अाहे.
-रमेश ठाकरे, अग्निशमन अधिकारी, अकोला.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News