कॉमर्सच्या द्वितीय वर्षाच्या निकालात घोळ; अभाविपचे निवेदन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 9 August 2019
  • अभाविप यवतमाळ शाखेने वाणिज्य विभागातील द्वितीय वर्षाच्या निकालांमधील घोळा झाला
  • यासंदर्भात अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उत्पल टोंगो यांना निवेदन दिले

यवतमाळ : शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या हक्काचे असून शैक्षणिक समस्या सुटून विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच अग्रेसर असते. आज अभाविप यवतमाळ शाखेने वाणिज्य विभागातील द्वितीय वर्षाच्या निकालांमधील घोळा झाला. यासंदर्भात अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उत्पल टोंगो यांना निवेदन देवून यावर तत्काळ तोडगा काढण्यात यावा. अशी मागणी करण्यात आली आहे.

विद्यापीठ प्रशासनाच्या व शिक्षक कर्मचार्‍यांच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. सदर बाब आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची. विद्यापीठातील परीक्षा विभाग असो किंवा अजून काही, तिथे चालणारा भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नेहमीच होत असते. कधी परीक्षा तोंडावर असून विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र मिळत नाही तर कधी 45 दिवस होऊन सुद्धा परीक्षांचे निकाल लागत नाहीत. अशा अनेक समस्यांमुळे अमरावती विद्यापीठ हे नेहमीच प्रसिद्धीला आल्याचा आरोप निवेदनाव्दारे करण्यात आला. 

नुकतेच अमरावती विद्यापीठांतर्गत होणार्‍या उन्हाळी परीक्षांचे निकाल लागले. या निकालांमध्ये वाणिज्य विभागातील द्वितीय वर्षाच्या निकालांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा चांगल्या पद्धतीने देऊनही त्यांच्या इंग्रजी, इनकम टॅक्स आणि अकाउंट या विषयांमध्ये जवळ जवळ सर्वच विद्यार्थी नापास झाले आहेत. परीक्षेनंतर तब्बल साठ दिवसांनंतर निकाल लावून सुद्धा विद्यापीठाने असे अनपेक्षित निकाल लावले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 या संदर्भात यवतमाळातील दाते महाविद्यालय आणि अमोलकचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन अभाविपच्या शिष्टमंडळाने अमरावती विद्यापीठाचे व्यवस्थापसन परिषदेचे सदस्य उत्पल टोंगो याच्याशी चर्चा करून सादर बाब लक्षात आणून दिली व या परीक्षांचे पुनःमूल्यांकन त्वरित व मोफत करावे असे निवेदन दिले. यावेळी उत्पल टोंगो यांनी अभाविप ला आणि विद्यार्थ्यांना आश्वासन देत पुर्नमुल्यांकनाचे लवकरात लवकर योग्य निकाल लावण्याची ग्वाही दिली. निवेदन देताना अभाविप शिष्टमंडळासोबतच महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी सहभागी होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News