आयआयटी इंजिनिअर्सची सामाजिक जबाबदारी ; 'उपाय'च्या माध्यमातून शिक्षणाचा जागर 

मंगेश गोमसे
Friday, 25 January 2019

आयआयटी सारख्या नामांकित संस्थांमधून उर्त्तीण झाल्यावर लगेच मोठी नोकरी व हवा तेवढा पगार घेणारे अनेक इंजिनिअर्स आपण पाहतो. परदेशात नोकरीची दालने खुली असल्याने ऐशोआरामाची जिंदगी त्यांची वाट पाहत असते. मात्र अशा नोकरीला बगल देत आपल्याच देशात राहून साधी नोकरी करायची अन्‌ गरीबांना शिक्षणाचा आधार देण्याचे काम काही आयआयटी तरुण करीत आहेत. 

आयआयटी सारख्या नामांकित संस्थांमधून उर्त्तीण झाल्यावर लगेच मोठी नोकरी व हवा तेवढा पगार घेणारे अनेक इंजिनिअर्स आपण पाहतो. परदेशात नोकरीची दालने खुली असल्याने ऐशोआरामाची जिंदगी त्यांची वाट पाहत असते. मात्र अशा नोकरीला बगल देत आपल्याच देशात राहून साधी नोकरी करायची अन्‌ गरीबांना शिक्षणाचा आधार देण्याचे काम काही आयआयटी तरुण करीत आहेत. 
            मौदा तालुक्‍यातील काही गावांत "उपाय'या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाचा जागर पसरविला जात आहे. एनटीपीसीत डेप्टी मॅनेजर असलेल्या वरुण श्रीवास्तव यांनी "उपाय' या एनजीओच्या माध्यमातून शिक्षणाचा प्रसार सुरू केला आहे. प्रकल्पग्रस्त गावातून सुरू झालेली ही संस्था आता नागपुरातील फुटपाथवर राहणाऱ्या गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करीत आहे. उत्तरप्रदेशातील झांसी गावात जन्मलेल्या वरुण श्रीवास्तवने आयआयटी खरगपूर मधून बी.टेक करीत असताना स्पेनमधील मॅड्रीड येथे इन्टर्नशिप केली. भारतातील व युरोपातील राहणीमानाचा आणि जीवनाचा परिचय त्याला आला. भारतात असलेली असमानतेची जाणीव त्याला होतीच. भारतात परत आल्यावर वरुणला शिक्षण पूर्ण करताच एनटीपीसीत सहज नोकरी मिळाली. वारणशीला वीज प्रकल्प विस्थापितांचा प्रश्न त्याच्या लक्षात आला. वाराणशीत असताना त्याने आपल्या एका मित्रासोबत "प्रयास' या उपक्रमाच्या माध्यमातून झोपडपट्टीतील मुलांना शिकविण्याचे काम सुरू केले. मात्र बदली झाल्याने त्याला हे काम सोडावे लागले. एनटीपीसी मौदा येथे आल्यावर त्याचे मन स्वस्थ बसत नव्हते. या परिसरात विस्थापितांची समस्या असल्याचे लक्षात येताच त्याने गावात शिकविण्याचे काम सुरू करण्याचे ठरविले. 
                 आयआयटी खडकपूरचा विद्यार्थी प्रतिक कांबळे व आयएसएम रायपूरचा विनय चौधरी यांच्या सहाय्याने २०११ साली  नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्‍यातील प्रकल्पग्रस्त कुंभारी गावात "उपाय'ची पहिली शाळा सुरू करण्याचे ठरविले. गावातील लोकांची अवस्था बिकट होती. प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळाला होता. मात्र त्याचे जीवनमानात फारसा बदल जाणवत नव्हता. गावातील मुला-मुलींचे शाळेत जाण्याचे प्रमाणही कमी होते. शाळा सुरू करण्यासाठी वरुणला अनेक अडचणी आल्या. कुणीही त्यांना जागा देत नव्हते. अशातच पाच लहान मुलांना रस्त्यावर शिकविणे सुरू केल्यावर लोकांचा विश्वास वाढत गेला. एका व्यक्तीने मुलांना आपल्या गच्चीवर शिकवावे असे सांगितले. लवकरच सरपंचाच्या मदतीने शाळेतीळ एक खोली मिळाली. यामुळे गावातील सर्व मुले-मुली शिकायला येऊ लागली. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News