‘व्हिसा’ला सोशल मीडियाचा आधार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 3 June 2019

अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता त्यांच्या वैयक्तिक माहितीबरोबरच सोशल मीडियातील युजर नेम, ई-मेल ॲड्रेस आणि फोन क्रमांक आदींची माहिती द्यावी लागणार आहे.

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता त्यांच्या वैयक्तिक माहितीबरोबरच सोशल मीडियातील युजर नेम, ई-मेल ॲड्रेस आणि फोन क्रमांक आदींची माहिती द्यावी लागणार आहे. अमेरिकेच्या व्हिसासाठी दरवर्षी अर्ज करणाऱ्या सुमारे १.५ कोटी विदेशी नागरिकांना नव्या बदलांचा फटका बसणार असल्याचे मानले जात आहे. 

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने व्हिसासाठी भरून द्याव्या लागणाऱ्या अर्जामध्ये बदल केले आहेत. त्यामुळे अमेरिकी व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांना आता स्वतःच्या वैयक्तिक माहितीबरोबरच सोशल मीडियासंदर्भातील इत्भूंत माहिती द्यावी लागणार आहे. सोशल मीडियातील युजर नेम, सर्व ई-मेल ॲड्रेस, फोन क्रमांक आदींची माहिती नव्या अर्जात भरावी लागणार आहे. नवे बदल मार्च २०१८ मध्ये प्रस्तावित करण्यात आले होते. या बदलांची प्रत्यक्ष अंमलबजावणी सध्या सुरू करण्यात आली आहे. 
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व्हिसासाठीच्या अर्जांची छाननी करण्याची प्रक्रिया अधिक कडक करण्यात आली आहे.

यापूर्वी अतिरिक्त चौकशी केली जाणाऱ्या अर्जदारांचीच सखोल माहिती घेतली जात होती. मात्र, आता सर्वच अर्जदारांना सोशल मीडियासंदर्भातील माहिती सादर करावी लागणार आहे. एकूणच व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांची सोशल मीडियातील ‘हिस्ट्री’ काटेकोरपणे तपासली जाणार आहे. सोशल मीडियातील ‘हिस्ट्री’वरून अर्ज करणाऱ्या व्यक्तीची सखोल ओळख पटविणे सोपे जाणार आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.    
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News