...म्हणून नीतेश राणेंना झाली अटक 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 5 July 2019
  • कणकवलीत रस्ते पाहणीदरम्यान प्रकार
  • महामार्ग उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की
  • अंगावर चिखल ओतून, पुलाला बांधून ठेवले 

कणकवली : महामार्ग उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेडेकर यांना धक्काबुक्की करणे, त्यांच्या अंगावर चिखल ओतणे, पुलाला बांधून ठेवणे याप्रकरणी आमदार नीतेश राणेंसह स्वाभिमान संघटनेच्या अन्य तिघांना कणकवली पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. अन्य १५ जणांना अटक करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. 

तत्पूर्वी नगराध्यक्ष समीर नलावडे व इतर अन्य ५० स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. धरपकड सुरू झाल्यावर आमदार राणे स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर झाले. या वेळी स्वाभिमान कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्याला घेराव घातला होता.

कणकवली शहरातील चिखलमय रस्त्यांची पाहणी करताना संतापलेल्या आमदार नीतेश राणे यांनी अभियंता शेडेकर यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. पंधरा दिवसांत शहरातील महामार्गावर दुतर्फा सेवा रस्ता तयार करा, उड्डाण पुलाच्या पिलरचे काम तातडीने बंद व्हायला हवे , असा इशारा  राणे यांनी या वेळी दिला. राणे हे शेडकर यांना प्रश्‍न विचारत असतानाच ‘स्वाभिमान’च्या कार्यकर्त्यांनी चिखलाने भरलेल्या बदल्या शेडेकर यांच्या अंगावर ओतल्या. त्यानंतर त्यांना गडनदी पुलावर बांधून ठेवण्याचाही प्रयत्न झाला. त्यानंतर गडनदी पूल ते प्रांत कार्यालयापर्यंत शेडेकरांना पाहणीसाठी आणले. तेथील चिखलातून त्यांना चालावयास भाग पाडले. या प्रकाराची व्हिडीओ क्‍लिप व्हायरल झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला. प्रांत कार्यालयाबाहेर आमदार राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी, आम्ही जनतेसाठी भांडतोय. रस्ते सुस्थितीत असावेत, यासाठी आमचा लढा सुरू आहे. त्यासाठी जेलमध्ये जावे लागले तरी चालेल.

यापुढे रस्ता सुधारणा झाली नाही, तर हायवे अधिकारी आणि ठेकेदारालाच खड्ड्यात घालू, असे राणे म्हणाले. या सर्व प्रकरणाचीने दखल घेत  प्रशासनाराणे आणि इतर ५० जणांविरोधात गुन्हा दाखल करत धरपकड सुरू केली.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News