तीन वर्षांत माझ्यात झाला एवढा बदल खूपच आहे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 8 August 2019
  • भारताचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच अत्यंत जागरुक असतो. त्याच्यामुळे भारतीय संघातील इतर खेळाडूंनासुद्धा फिटनेसचे महत्त्व कळाले

नवी दिल्ली - भारताचा कर्णधार विराट कोहली हा त्याच्या फिटनेसच्या बाबतीत नेहमीच अत्यंत जागरुक असतो. त्याच्यामुळे भारतीय संघातील इतर खेळाडूंनासुद्धा फिटनेसचे महत्त्व कळाले. विराट कोहलीने त्याच्या ट्विटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याचया फिटनेसमध्ये तीन वर्षांत झालेला बदल स्पष्ट दिसत आहे. 

टेकनिक परफेक्ट करण्यासाठी तुमच्याकडे संयम असण्याची गरज आहे. हा व्यायाम मी गेली तीन वर्षे करत आहेत आणि त्यामुळेच मी यात आता पारंगत झालो असून आता माझी ताकदही वाढली आहे. त्यामुळेच नवीन काहीतरी शिकत असताना नेहमी संयम ठेवा,'' असे ट्विट त्याने केले आहे. 

या ट्विटमध्ये तो 2016 म्ध्ये एक व्यायाम करताना दिसत आहे तर शेजारीच 2019मध्ये तोच व्यायम करतानाचा व्हिडिओ आहे. 2016मध्ये जो व्यायाम करायला त्याला कष्ट घ्यावे लागत होते तोच व्यायम आता तो अगदी सहजपणे करताना दिसत आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News