...म्हणून पाकिस्तान पेक्षा भारताची परिस्थिती चिंताजनक

स्वप्नील भालेराव (सकाळ वृत्तसेवा-यिनबझ)
Tuesday, 22 October 2019

विकसनशील भारताचं 'विकसित' होण्याचं स्वप्न भंग होणार की काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. भारतातील जनतेला पोटभर अन्न मिळत नाही.

विकसनशील भारताचं 'विकसित' होण्याचं स्वप्न भंग होणार की काय? अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. भारतातील जनतेला पोटभर अन्न मिळत नाही. त्यामुळे देशातील बालकांचे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे. ग्लोबल हंगर इंडेक्स (GHI) नुसार जगातील 177 देशापैकी 102 वा क्रमांक भारताचा आहे. 2014 मध्ये जगातील 77  देशापैकी भारतचा 55 वा क्रमांक होता.
 

वार्षिक जागतिक निर्देशांक (Annual global index)-
राष्ट्रीय स्तरावर कुपोषणाचे प्रमाण मोजणे, कुपोषण निर्मुलन करणे आणि कुपोषणाचे प्रमाण का वाढतेय याचे मुल्यामापन करण्यासाठी वार्षिक जागतिक निर्देशांक काढला जातो. त्यामुळे कोणत्या देशात कुपोषणाचे प्रमाण वाढले आहे, याची माहिती मिळविता येते. ज्या देशाचा निर्देशांक जास्त असेल त्या देशात कुपोषणाचे प्रमाण अधिक असते.

ग्लोबल हंगर इंडेक्स-
हा चार घटकांचा अभ्यास करुन तयार केला जातो. कुपोषण, बालमृत्यू, चाइल्ड वेस्टिंग, बालकांचा वृद्धी दर या चार घटकांचा समवेश होतो.

भारताची स्थिती-
दक्षिण आशियातील देशात गरिब समजले जाणारे पाकिस्तान (94), बांग्लादेश (88), नेपाळ (73) आणि श्रीलंका (66) या पेक्षाही जास्त कुपोषणाचे प्रमाण आहे.
 
Wealthungerhilf and Concern Worldwide रिपोर्टनुसार-
भारतात 6 ते 23 महिन्याच्या बालकांना केवळ 9.6 प्रमाण अन्न दिले जाते. 2015-16 मध्ये 90 टक्के कुटुबांनी पिण्यायोग्य पाण्याच वापर केला आहे. तर 39 टक्के घरात स्वच्छता गृहाची सोय नाही. 45 देशात कुपोषणामुळे खुप गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात भारताचा समावेश आहे.    
 
 

स्वच्छ भारत अभियान फेल
महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टेबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा कोली होती. ग्रामीण भागात 'उघड्यावर संडास पासून मुक्ती' (ओडीएफ) योजनेची मोठी जाहीरात करुन गजावाजा केला होता. 'प्रत्येक कुटुंबाला सौचालय बांधुन देण्यात येईल, त्यामुळे संपुर्ण भारत देशात उड्यावर कोणीच संडास करणार नाही' असे प्रधानमंत्री यांनी जाहीर केले होते. या रिपोर्टनुसार सरकारने नवीन शौचालय बांधुन दिले तरी देखील उड्यावर संडास केले जात आहे. यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.  यामुळे लहान मुलांची वाढ खुंटत चालली आहे. मुलांचा बौद्धिक विकास होत नाही आहे.
 

दक्षिण आशियातील नेपाळ आणि बांग्लादेश या दोन्ही देशांनी कुपोषण मुक्तीसाठी विशेष प्रयत्न केले आहे. त्यामुळे दोन्ही देशात कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. भारतात असे प्रयत्न झाले नाहीत त्यामुळे कुपोषणाचे प्रमाण वाढत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News