शेतकरी मुलांच्या हातातील स्मार्टफोन ने माझा घात केला: राजू शेट्टी

सुयोग घाटगे
Tuesday, 18 June 2019
  • संघाने पसरवलेल्या मेसेज आणि खोट्या प्रचाराचे हे तरुण बाळी पडले.
  • याच स्मार्टफोन वर संघाच्या प्रचाराला हे शेतकरी कुटुंबातील तरुण बळी पडले. ही संघाची स्ट्रॅटर्जीच आहे.
  • तरुणांपुढे मोदी हे जणू सुपरहिरो असल्याचे चित्र उभे केले आहे. या मुळेच निवडणुकांचे निकाल असे आहेत.

कोल्हापूर: शेतकऱ्याच्या मुलाच्या हातात आलेला स्मार्टफोन ने माझा निवडणुकीत घात केला. संघाने पसरवलेल्या मेसेज आणि खोट्या प्रचाराचे हे तरुण बाळी पडले. त्याच्याच परिनामाखातर माझा पराभव झाला असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. सकाळ कार्यालय येथील भेटी प्रसंगी ते बोलत होते.
 
शेतकऱ्याच्या आयुष्यात आम्ही आर्थिक स्थैर्य आणले. याच आर्थिक स्थैर्यातून त्यांच्या पुढच्या पीडीच्या हातात आधुनिक जगातील स्मार्ट फोन आला. याच स्मार्टफोन वर संघाच्या प्रचाराला हे शेतकरी कुटुंबातील तरुण बळी पडले. ही संघाची स्ट्रॅटर्जीच आहे. अपप्रचार करायचा, अगदी टोकाचे आरोप करायचे. विखारी प्रचार करून समोरच्याची इमेज बिघडवायची हे त्यांचे तंत्र आहे. 

एखादी इमेज बिल्डिंग कशी करायची अथवा बिघडवायची हे काम यांच्या सारखे कोणीच करू शकत नाही. यांनी तरुणांपुढे मोदी हे जणू सुपरहिरो असल्याचे चित्र उभे केले आहे. या मुळेच निवडणुकांचे निकाल असे आहेत. मात्र लवकरच या पिढीचा भ्रमनिरास होणार आहे. देशामध्ये बेरोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न आहे. आता जॉब टिकवणेच कठीण झाले आहे. नवीन मिळणे हे महाकठीण आहे. लाखो रुपये शिक्षणावर खर्च करून अगदी तुटपुंज्या पगाराच्या नोकऱ्या करण्याची वेळ तरुणांवर आली आहे. ही पोरं भरकटलेली असली तरीही आमचीच पोरं आहेत. थोड्याच दिवसात पुन्हा जागेवर येतील. असे देखील ते या वेळी म्हणाले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News