सोळावं वरीस लेटनाइट चॅटिंगचं

मंगेश गोमसे
Friday, 25 January 2019

सोशल नेटवर्किंग साईट्‌स, स्मार्टफोन व रात्री जागण्याची सवय या तिन्ही गोष्टी एकमेकांना पुरक झाल्या आहेत. यांच्या  संगमातून "लेटनाईट चॅटिंग' ही नवी संस्कृती उदयास येत आहे. कुमार वयातून तारुण्यात पर्दापण केलेल्या नव तरुणांना याचे खूप आकर्षण आहे. दिवसभर मित्रांच्या गप्पा रंगल्यावर व खूप काही बोलल्यावर एकमेकांपासून दूर जाणे त्यांना अवघड वाटत असावे. यामुळेच रात्री देखील मुले एकमेकांसोबत चॅटिंग करताना दिसत आहे. मात्र हा छंद या मुलांसाठी सर्वांच्या दूर घेऊन जाणारा असल्याचे मानले जात आहे.

सोशल नेटवर्किंग साईट्‌स, स्मार्टफोन व रात्री जागण्याची सवय या तिन्ही गोष्टी एकमेकांना पुरक झाल्या आहेत. यांच्या  संगमातून "लेटनाईट चॅटिंग' ही नवी संस्कृती उदयास येत आहे. कुमार वयातून तारुण्यात पर्दापण केलेल्या नव तरुणांना याचे खूप आकर्षण आहे. दिवसभर मित्रांच्या गप्पा रंगल्यावर व खूप काही बोलल्यावर एकमेकांपासून दूर जाणे त्यांना अवघड वाटत असावे. यामुळेच रात्री देखील मुले एकमेकांसोबत चॅटिंग करताना दिसत आहे. मात्र हा छंद या मुलांसाठी सर्वांच्या दूर घेऊन जाणारा असल्याचे मानले जात आहे. बंगलुरू येथे "इन्टरनेट ऍडिक्‍शन क्‍लिनिक' सुरू झाल्याने खरोखरच महाजालाच्या चक्रव्ह्यूवात युवक अडकत चालले आहेत काय असा सवाल केला जात आहे.

व्हॉट्‌सऍप, हाईक, फेसबुक व ऑनलाईन चॅटिंगच्या साईट्‌स यावर जास्तीत जास्त वेळ युवकांचा राबता आहे. यामुळे त्यांच्या दैनदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे दिसते. शहरातील युवक सुध्दा या ऑनलाईनच्या जाळ्यात अडकलेले आहेत. मिडनाईट मॅडनेस शाळेतून दहावा वर्ग पास करून बाहेर पडणारा युवक कॉलेजात जातो तो हातात स्माटफोन घेउनच. कॉलेजात सर्वांशी ओळखी झाल्यावर मग चॅटिंगवरच मन रमत असल्याचे दिसते. कॉलेजमध्ये दिवसभर मित्रांसोबत राहिल्यावर रात्री घरी स्मार्ट फोनवरून एक मेकांविषयी अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न चॅटिंगच्या माध्यमातून चाललेला असतो. 'सोळावं वरीस धोक्‍याचं...' अशी भारतीय समाजाची पारंपरिक धारणा असतेच. याच वयात 'बाह्य' आकर्षणांचे प्रमाणही वाढत असते. मात्र, आता ही झाली जुनी-पुराणी गोष्ट! सध्या मात्र, 'सोळावं वरीस लेटनाइट चॅटिंगचं,' म्हणावं अशी परिस्थिती आहे

शाळा, कॉलेज आणि क्‍लासच्या चक्रामध्ये अडकलेले आजचे 'टीनएजर्स' रात्री उशीरापर्यंत आपल्या मित्र-?मैत्रिणींशी आणि भावंडांशी व्हॉटसअप आणि फेसबुकवर चॅटिंग करण्यात व्यस्त असतात असे दिसून आले आहे. त्या अथार्ने या 'मिडनाइट मॅडनेस'मुळे ऐन सोळाव्या वर्षांमध्ये चॅटिंगची सवय अंगवळणी पडत असल्याचे दिसते आहे.बेंगळुरूमध्ये भारतातील पहिले इंटरनेट व्यसनमुक्ती क्‍लिनिक सुरू करणाऱ्या डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी याबाबतची निरीक्षणे नोंदविली आहेत.

नवी दिल्लीमध्ये राहणारी गुंजन जैन सांगते, 'रोज साधारणपणे मध्यरात्री दीड ते दोनपर्यंत मी चॅटिंग करते. दिवसभर बिझी शेड्युलमुळे कोणत्याच मित्र-मैत्रिणींशी बोलता येत नाही. पुढच्या वर्षी असणाऱ्या मेडिकल एंटरन्ससाठी गॅप घेतला आहे. मात्र, आयुष्यात मित्र-मैत्रिणींचं स्थान महत्त्वाचं असल्यामुळे त्यांना वेळ देणं महत्त्वाचं वाटतं.' दिल्लीतील इंद्रप्रस्थ विद्यापीठातील निमिषा कुमारही मध्यरात्रीपर्यंत रोज चॅटिंगमध्येच गुंतलेली असते.

'आम्ही रात्री ग्रुपवर गप्पा मारतो. फोटो, व्हिडिओ शेअर करतो. ट्विटरवर सेलिब्रेटींना फॉलो करतो. आम्ही रात्रीच्या उत्सुकतेने वाट पाहत असतो.' इंटरनेट व्यसनाधीन झालेल्या टीनएजर्सची विविध निरीक्षणेही कुमार यांनी नोंदविली असून, या व्यसनापासून पाल्याची सुटका करून घेण्यासाठी पालकांनी कठोर निर्णय घेण्याची आवश्‍यकता असल्याचेही कुमार यांनी म्हणले आहे. काही कॉलेजियन्सतर पहाटे चारवाजेपर्यंत ऑनलाइन असतात, असेही आढळून आले आहे. सवयी बदलण्याची गरज मोबाइलवर चॅटिंगची एक नशा चढत जात असल्याचे समोर आले आहे रस्त्यावरून चालताना, लिफ्टमध्ये असताना, जेवताना, टिव्ही पाहताना अशा वेगवेगळ्या क्रिया करतानाही चॅटिंग करणाऱ्या  युवक-युवतींचे प्रमाणही वाढत चालल्याचे दिसून आले आहे.

प्रौढही बळी... 'अर्थात हा ट्रेंड केवळ टीनएजर्सपुरताच नाही. तिशी आणि चाळीसतले त्याच्या आहारी गेल्याचे जाणवते आहे. पन्नासीच्या पुढच्यांमध्येही व्हॉटस ऍप, फेसबुक, ट्विटरसारख्या सोशल मीडियाचे कमालीचे आकर्षण वाढताना दिसते आहे. हे सारेच इंटरनेट व्यसनाधीनतेकडे निघाल्यासारखे वाटते आहे. याचे मानसिक, सामाजिक आणि व्यावसायिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होताना दिसतो आहे...', असे मतही तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.

६०  टक्के टीनएजर्स प्रतिदिन टेक्‍स्ट मेसेज पाहतात १,५०,८०,३४० फेसबुकचे टीनएजर्स यूझर्स ५ कोटी व्हॉटस अप वापरणारे भारतीय स्मार्टफोनच्या भुलभुलैय्यात सोशल साइट खिशात स्मार्टफोन आहे. इंटरनेट तर सुरू असेलच. अन्‌ हो तुम्हाला नेहमीप्रमाणे फेसबूक, ट्विटर, गूगल प्लस सारख्या सोशल नेटवर्किंग साइटवर फिरायची हौस ही असेलच. तर चला मग. तुम्ही कशाला मागे रहाताय. लाइक करा, शेअर करा, कॉमेण्ट करा अन्‌ चक्क घरबसल्या पैसे मिळवा. या काही खोट्या भूलथापा नाहीत. त्यासाठी फक्त थोडी वाट पहावी लागेल. फेसबुकवरून एखादी माहिती इतरांपर्यंत पोहोचवता येते. इतरांनी शेअर गेलेली पोस्ट, व्हिडीओ, फोटो पाहता येते. मात्र फेसबुकमुळे युजरचा मूड बदलण्यासही मदत होते, ही बाब समोर आली आहे.

फेसबुकने युजर्सच्या नकळत केलेल्या एका प्रयोगातून हा निष्कर्ष समोर आला आहे. निराश व्यक्तीने फेसबुकवर पॉझिटिव्ह पोस्ट पाहिल्या, तर तुमचा मूड बदलू शकतो. तर आनंदी व्यक्तीने निगेटिव्ह पोस्ट पाहिल्या, तर त्याचा मूडही जाऊ शकतो. सहा लाखांहून अधिक युजर्सवर केलेल्या प्रयोगात हे निष्कर्ष आढळून आले आहेत. कुठलाही क्रम किंवा कुठलाही निकष न लावता हे युजर्स निवडण्यात आले होते. संशोधकांनी या युजर्सच्या पोस्ट थेट पाहिल्या नसल्या, तरी केवळ लाख पोस्टमधील कोटींहून अधिक शब्दांची चाचपणी करून त्यातील पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह शब्दांवरून हा निष्कर्ष नोंदविण्यात आला. यामध्ये एकूण लाख शब्द पॉझिटिव्ह तर लाख निगेटिव्ह शब्द असल्याचे आढळून आले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News