मिस महाराष्ट्र बनून  अवतिकाने केली परिस्थितीवर 'मात'

समीर मगरे
Friday, 25 January 2019

घरी जेमतेम परिस्थिती, त्यात वडिलांचे छत्र हरवलेले. अशा परिस्थितीवर मात करत अवतिकाने सन 2016-17 ची 'मिस महाराष्ट्र' म्हणून आपली एक वेगळीच छाप उमटवली. मुलीच्या या यशामुळे आईच्या आनंदाला सिमा उरली नाही.

घरी जेमतेम परिस्थिती, त्यात वडिलांचे छत्र हरवलेले. अशा परिस्थितीवर मात करत अवतिकाने सन 2016-17 ची 'मिस महाराष्ट्र' म्हणून आपली एक वेगळीच छाप उमटवली. मुलीच्या या यशामुळे आईच्या आनंदाला सिमा उरली नाही.

यवतमाळ येथील अवंतिका वैशाली बरडे हिची परिस्थिती पाहला तर अगदी गरिबीची. घरचा सर्व भार आई, वैशाली बरडे यांच्यावर. त्यामुळे संसाराचा गाडा चालवून एक मुलगा व मुलगी हिच्या स्वप्नालाही योग्य दिशा देण्याचे काम त्या माऊलीने केले. मुलांना कधीही वडिलांची कमी जाणवू दिली नाही. आई-वडील असे दोन्ही जबाबदाऱ्या पूर्ण करत वैशाली बरडे हिने मुलांचे संगोपन केले. यात 2016-17 हे वर्ष या कुटुंबासाठी खूप महत्वाचा ठरला. अवंतिका हिची निवड “मिस महाराष्ट्र“ म्हणून झाली. या क्षेत्राला खरे तर 'पैसे वाल्याचे क्षेत्र' म्हणून ओळखले जाते मात्र सर्व सामान्य कुटुंबातून आलेल्या अवतिकांनी या वाक्याला पूर्णविराम दिला. या स्पर्धेत तिची आई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. आईने अवतिकाला हिम्मत देत स्पर्धांत सहभाग घेण्यास सांगितले. अवतिकाची निवड मिस महाराष्ट्र म्हणून झाल्याने कुटुंबासह संपूर्ण यवतमाळसाठीच अभिमानाच दिवस ठरला. यापुढे देखील अवंतिका स्पर्धांत सहभाग घेणार आहे. आपल्या कुंटूबाला हातभार लागावा म्हणून तीपण प्रयत्न करत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News