येथे जुळली सोशल मिडीयावरून रेशीमगाठी...

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 5 June 2019
  • पोपट सोनवणे, रामदास सोनवणे यांचा उपक्रम
  • व्हाटस अँपग्रुपच्या माध्यमातून ३ वर्षात ७५ वधूवरांचे विवाह जुळले आहेत.

तळोदा - सोशल मीडिया आज समाजजीवनात इतका भिनला आहे की प्रत्येकाची गरज होऊन बसला आहे. विवाहाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते; पण आजच्या बदलत्या युगात व्हाॅट्‌सअॅपवरून जुळताहेत रेशीमगाठी म्हणण्याची वेळ आली आहे.

खापर (ता. अक्कलकुवा) येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक पोपट पंडित सोनवणे व त्यांचा मुलगा रामदास पोपट सोनवणे यांनी व्हाटसअॅपच्या माध्यमातून उपवर वधू-वरांसह त्यांच्या पालकांसाठी पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. व्हाटस अँपग्रुपच्या माध्यमातून ३ वर्षात ७५ वधूवरांचे विवाह जुळले आहेत. अजुन बरेच विविह जुळण्याच्या  मार्गावर आहेत. व्हाटस अँपचे वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. सरकारी नोकर वधुवर, शिक्षक वधूवर, डाँक्टर वधूवर, इंजिनिअर वधुवर, गोरगरीब वधूवर, आंतरजातीय वधुवर, खानदेश माळी वधुवर, आरोग्यसेवक वधुवर असे ७३ वधुवर सुचक ग्रुप तयार करुन पालकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी शैक्षणिक ग्रुप तयार करून शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक माहिती उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांसाठी शेतकरी राजा ग्रुप तयार केला आहे. बेटी बचाव बेटी पढाव वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम राबवले आहेत. 

श्री. पोपट सोनवणे हे मूळ भामेर (ता. साक्री, जि. धुळे) येथील रहिवासी आहेत, पण ते खापर येथे स्थायिक झाले आहेत. त्यांचा मुलगा रामदास सुरत येथे आय सी आय सी बँकेत नोकरीला आहेत. नोकरी सांभाळून ते सामाजिक कार्य करित आहेत. विशेष म्हणजे ते वधूवराकडून /पालकाकडुन कुठलेही पैसे घेत नाही. पोपट सोनवणे (९६५७२४३५५२/ ८२७५३८२१५९) आणि  रामदास सोनवणे ( ६३५३५०६५१३/ ७५६७५००५८२) असे त्यांचे व्हाट्सअप क्रमांक आहेत,त्यावर संपर्क करता येईल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News