ड्रेनेजच्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • ज्ञानेश विद्यामंदिरमधील विद्यार्थी, शिक्षक त्रस्त, आरोग्य धोक्‍यात

औरंगाबाद - सिडको, एन-२, ठाकरेनगर परिसरातील ज्ञानेश विद्यामंदिर शाळेच्या मैदानावर परिसरातील ड्रेनेजचे घाण पाणी साचले आहे. त्यामुळे मुलांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. साठलेल्या पाण्याची दुर्गंधी व त्यावर बसलेल्या माशा, डासांमुळे विद्यार्थी आजारी पडत आहेत; मात्र पाठपुरावा करून याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

महापालिकेतर्फे महिनाभरापासून रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शाळेसमोरून जाणारा रस्ता खोदण्यात आला आहे. त्यालगतच ड्रेनेजचे दुरुस्तीचे काम महापालिकेतर्फे हाती घेण्यात आले आहे.

शाळेच्या गेटच्या भिंतीलगत ड्रेनेजच्या झडपा उघड्या ठेवल्या आहेत. त्यामुळे या ड्रेनेजचे पाणी शाळेच्या मैदानावर जात आहे. साठलेल्या पाण्यामुळे वर्गात डास, माशा, दुर्गंधीमुळे अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत. एक महिना उलटून गेला तरी हे काम अर्धवट स्थितीत आहे. या कामाचे पैसे महापालिकेकडून न मिळाल्याने कंत्राटदाराने काम अर्धवट स्थितीत सोडले आसल्याचे स्थानिक नगरसेवक दामुअण्णा शिंदे यांनी सांगितले. 

मागील  दिवसांपासून ड्रेनेजचे पाणी शाळेच्या मैदानावर येत आहे. त्या पाण्याच्या दुर्गंधीमुळे डबा खाण्याची इच्छा होत नाही. माशा, डास व दुर्गंधीमुळे शाळेतही बसता येत नाही.
- मेघा जाधव, विद्यार्थिनी

शाळेच्या मैदानावर साठलेल्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे खेळता येत नाही. मैदानावर आले तरी दुर्गंधीमुळे मळमळ होते. महापालिकेने लवकरात लवकर हे चेंबर दुरुस्त करावे.
- मुकुंद बागडे, विद्यार्थिनी.

शाळेच्या मैवर साठलेल्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे आमच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांना गॅस्ट्रो, मलेरिया, डायरियासारखे आजार उद्‌भवत आहेत. शाळेचे तीन विद्यार्थी या ड्रेनेजमध्ये घसरून पडले आहेत. याची प्रशासनाने दखल घ्यावी.
- पवन मोरे (विद्यार्थी)

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News