सिद्धूंचा राजीनामा राहूल गांधीकडे आणि राहूल गांधींचा राजीनामा?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 14 July 2019

नेहमीच वादात असलेले पंजाबचे मंत्री नवजोत सिंह सिध्दूंनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिध्दूंनी आपला राजीनामा राहुल गांधींना पाठवला आहे. तर या बद्दलची माहिती सिध्दूंनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली.

नेहमीच वादात असलेले पंजाबचे मंत्री नवजोत सिंह सिध्दूंनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सिध्दूंनी आपला राजीनामा राहुल गांधींना पाठवला आहे. तर या बद्दलची माहिती सिध्दूंनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून माहिती दिली.

अमरिंदर सिंह यांच्यासोबत खूप दिवस सुरू होती वाटाघाट
पंजाबचे मुख्यमंत्री कैप्टन अमरिंदर सिंह आणि सिद्धू यांच्यात गेले काही दिवस वाटाघाट सुरू होती. सिद्धू पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या शपथविधीच्या वेळेस पाकिस्तानमध्ये गेले होते, त्यावेळेपासून पंजाबचे मुख्यमंत्री आणि सुद्धू यांच्यात वाद सुरू होते.

नवजोत सिंह सिद्धू यांनी एकदा वक्तव्य केलं होतं की 'राहूल गांधी अमेठीतून निवडणूक हारतील तर ते राजकारण सोडतील'. या वक्तव्यावरून देखील नवजोत सिंह सिद्धू चर्चेचा विषय बनला आहे.

याआधीही नवजोत सिंह सिद्धू यांनी एकदा आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. आता जरी नवजोत सिंह सिद्धू यांनी राहूल गाधींकडे राजीनामा पाठवला असला तर राहूल गांधींनी स्वत: राजीनामा दिला असल्याने नेमकं नवजोत सिंह सिद्धू यांचा राजीनामा कोण स्विकारणार याकडे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News