टिकटॉक फेम सिद्धू अभंगला अखेर बेडया 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 5 October 2019

'टिकटॉक'वर 'भाईगिरी'चे व्हिडिओ टाकत गुन्हेगारीकडे वळलेला टिकटॉकस्टार सिद्धेश बाळा म्हसकर उर्फ सिद्धू अभंगे (२७) याला पोलिसांनी चिपळूण येथून अटक केली.

सोशल मीडिया म्हणजे जगभरात एकमेकांशी कनेक्ट होणारे एक  साधन समजले जाते. मात्र ह्या सोशल मीडियाचा वापर कोण कसा करेल ह्याची खात्री कोणी घेऊ शकत नाही.या माध्यमांचा जसा चांगला वापर केला जातो. तसाच त्याचा गैरफायदा आणि गैरवापर करणारे बरेच आहे. अश्याच पद्धतीचा गैरफायदा घेणाऱ्या एका टिकटॉक फेम तरुणाला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
 
'टिकटॉक'वर 'भाईगिरी'चे व्हिडिओ टाकत गुन्हेगारीकडे वळलेला टिकटॉकस्टार सिद्धेश बाळा म्हसकर उर्फ सिद्धू अभंगे (२७) याला पोलिसांनी चिपळूण येथून अटक करून दोन वर्षांसाठी स्थानबद्ध केले आहे.सिद्धेश हा ठाण्यातील कोपरी परिसरातील रहिवासी आहे. त्याच्यावर खंडणी, हत्येचा प्रयत्न, धमकी देणे इत्यादी गुन्ह्यांची नोंद कोपरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सिद्धेश हा ठाण्यातील कोपरी परिसरातील रहिवासी आहे. त्याच्यावर खंडणी, हत्येचा प्रयत्न, धमकी देणे इत्यादी गुन्ह्यांची नोंद कोपरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.टिकटॉकमार्फत मिळणाऱ्या प्रसिद्धीचा पुरेपूर फायदा घेत सिद्धेशने ठाणे परिसरात खंडणी उकळण्यास सुरुवात केली. त्यातून त्याने अनेकांवर हत्याराने हल्ले करून हत्येचा प्रयत्न केले. कोपरी परिसरात त्याने व्यावसायिक तसेच फेरीवाल्यांमध्ये स्वतःच्या नावाची दहशत निर्माण केली होती, अशी माहिती कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी दिली. पोलीस ठाण्यात त्याच्यावर असलेल्या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत अखेर त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे. 

अटकेच्या भीतीने त्याने ठाणे शहर सोडून पश्चिम महाराष्ट्, हैदराबाद इत्यादी भागात आश्रय घेतला होता. अखेर कोपरी पोलिसांनी त्याचा माग काढत चिपळूण येथून अटक केली. दोन वर्षांसाठी त्याची रवानगी ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे, असे निरीक्षक आगरकर यांनी सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News