सिध्दार्थ परिणीती पुन्हा एकत्र

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 1 July 2019
  • ‘हसी तो फसी’ या चित्रपटामधून सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राची जोडी रूपेरी पडद्यावर एकत्र आली होती.

‘हसी तो फसी’ या चित्रपटामधून सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राची जोडी रूपेरी पडद्यावर एकत्र आली होती. या दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही उत्तम जुळून आली. आता चार वर्षांनंतर पुन्हा त्यांचा एकत्रित चित्रपट येत आहे. ‘जबरिया जोडी’ या चित्रपटामधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात सिद्धार्थ अभय सिंग हे पात्र साकारणार आहे, तर परिणीती बबली यादव हे पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रशांत सिंह दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. ‘हसी तो फसी’नंतर सिद्धार्थ-परिणीतीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री काय कमाल करते हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News