सिद्धांत कपुरची मराठी चित्रपट करण्याची इच्छा... .

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 21 October 2019

लहानपणापासुन मी दादा कोंडके यांचा खुप मोठा चाहता आहे. त्यांचे सर्व चित्रपट मी पाहिले असुन मी त्यांचा खुप मोठा चाहता आहे.

शुटआउट अॅट वडाळा, हसीना पारकर, याराम या चित्रपटातुन अभिनेता सिद्धांत कपुर प्रेक्षकांसमोर आला. याशिवाय भुलभुलैया चुप चुप के यांसारख्या चित्रपटात सहायक दिगदर्शक म्हणुन उत्तम कामगिरी बजावली. 

सिद्धांतने मराठी विनोदी चित्रपट करायची ईच्छा व्यक्त केली आहे. याबद्दल सिद्धांत म्हणतो की, लहानपणापासुन मी दादा कोंडके यांचा खुप मोठा चाहता आहे. त्यांचे सर्व चित्रपट मी पाहिले असुन मी त्यांचा खुप मोठा चाहता आहे. त्यांच्या विनोदाचे टायमिंग खूपच परफेक्ट आहे. आणि म्हणुनच भविष्यात मला एकतरी मराठी चित्रपट करायचा आहे. त्यामुळे सिद्धांत मराठी चित्रपटांमध्ये कधी दिसतो, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News