अजब 'गिल'चा गजब पराक्रम !

सकाळ (यिनबझ)
Saturday, 10 August 2019

"टिम इंडिया'चे दरवाजे ठोठावत असलेल्या शुबमन गिल याने भारत "अ' संघाकडून विक्रमी द्विशतकी खेळी केली.

तारौबा (त्रिनिदाद) - "टिम इंडिया'चे दरवाजे ठोठावत असलेल्या शुबमन गिल याने भारत "अ' संघाकडून विक्रमी द्विशतकी खेळी केली. येथील ब्रायन लारा स्टेडियमवर वेस्ट इंडीज "अ' विरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या चारदिवसीय "अनधिकृत' कसोटी क्रिकेट सामन्यात त्याने 204 धावांची नाबाद खेळी केली. 

तीन कसोटींच्या मालिकेत भारताने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.  3 बाद 14 धावसंख्येवर गिल मैदानात उतरला. त्यानंतर थोड्याच वेळात 4 बाद 50 अशी दुरवस्था झाली. अशा वेळी गिलने कर्णधार हनुमा विहारीसह (नाबाद 118) 315 धावांची नाबाद भागीदारी रचली. गिलने 250 चेंडूंना सामोरे जाताना 19 चौकार आणि 2 षटकार मारले. भारत "अ' संघाने 4 बाद 365 धावसंख्येवर डाव घोषित केला. विंडीज अ समोर 373 धावांचे आव्हान आहे. तिसऱ्या दिवसअखेर त्यांनी बिनबाद 37 धावा केल्या. 

"गजब' का गिल! 

 • भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघाकडून द्विशतक काढलेला सर्वांत कमी वयाचा फलंदाज 
 • गिलचे वय 19 वर्षे 334 दिवस 
 • याआधीचा उच्चांक गौतम गंभीरचा 
 • 2002 मध्ये झिंबाब्वेविरुद्ध गंभीरचे अध्यक्षीय संघातर्फे द्विशतक 
 • भारताबाहेर द्विशतक काढलेला सर्वांत कमी वयाचा फलंदाज 
 • यापूर्वीचा उच्चांक अब्बास अली बेग यांचा 
 • बेग यांची 1959 मध्ये ऑक्‍सफर्ड विद्यापीठातर्फे फ्री फॉरेस्टर्सविरुद्ध ऑक्‍सफर्डला 221 धावांची नाबाद खेळी 
 • तेव्हा बेग यांचे वय 20 वर्षे 79 दिवस 
 • "अ' कसोटीत परदेशात द्विशतक काढलेला पाचवा फलंदाज 
 • फलंदाज धावा प्रतिस्पर्धी मैदान वर्ष 
 • धीरज जाधव 260* केनिया नैरोबी 2004 
 • नमन ओझा 219* ऑस्ट्रेलिया "अ' ब्रिस्बेन 2014. 
 • चेतेश्‍वर पुजारा 208* वेस्ट इंडीज "अ' क्रॉयडॉन 2010 
 • वेणुगोपाळ राव 200* केनिया नैरोबी 2004 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News