शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 17 August 2019

प्रकाशक - सकाळ प्रकाशन 
लेखक :  आशा साठे  
पुस्तकाचे नाव : शुभबुद्धीचे उपासक रवींद्रनाथ     
आयएसबीएन :  978-93-87408-91-3
किंमत :  रु. १४०
पृष्ठे : ११२
आकार : ५.५"x ८.५"
श्रेणी : चरित्र, शिक्षण   

पुस्तकाविषयी  
साहित्य चित्रकला शिल्पकला नृत्य संगीत हा माणसाच्या जगण्याचा भाग मानणारे, जगण्याचा उत्सव साजरा करायला शिकवणारे कलावंत शिक्षणतज्ज्ञ रवींद्रनाथ 

मातृभाषा, मातृभूमी यांची कीर्ती आपल्या कर्तृत्वाने वाढवणारे; इथल्या मातीतली कविता जगभरात पोहोचवणारे; नोबेल पुरस्काराने गौरवलेले तत्त्वज्ञ महाकवी रवींद्रनाथ

अशा  गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा आढावा घेणारे चरित्र. 

आनंददायी शिक्षणाचा वस्तुपाठ घालून देणारे शांतिनिकेतन, स्वावलंबी ग्रामव्यवस्थेचा पाया असणाऱ्या उद्योगनिर्मितीसाठी आवश्यक कौशल्ये शिकवणारे श्रीनिकेतन, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारे विश्वभारती विद्यापीठ या गुरुदेवांच्या कल्पनेतून साकारलेल्या संस्था, त्यांचे विपुल साहित्य यांचा आढावा.  

आपल्या आजूबाजूला असलेल्या संघर्ष - कोलाहलातही जगण्याचा उत्सव साजरा करता येतो. आपल्यासह इतरांचेही आयुष्य आनंदी, सुंदर आणि समृद्ध करता येते, हे स्वतःच्या जगण्यातून शिकवणारे रवींद्रनाथ समजून घेणे आजच्या काळातही सुसंगत ठरते. सहजसोप्या भाषेत, रसाळ शैलीत लिहिलेले हे चरित्र आनंदाने जगण्याचा मार्ग धुंडाळण्यासाठी प्रेरणा देते.   
   
लेखक परिचय
आशा साठे यांनी कथा, नाटक, भाषांतर, ललित लेखन, समीक्षा अशा विविध प्रकारांत लेखन केले आहे. आपल्या 'निजखूण', 'रसज्ञ ऋषीच्या सहवासात', 'चंद्र माझा', 'तिचे क्षितिज' अशा विविध कार्यक्रमांचे लेखन आणि सादरीकरण. आकाशवाणीवरील साहित्यविषयक कार्यक्रमांचे लेखन. वाचन चळवळ, साहित्यविषयक विविध उपक्रमांमध्ये सहभाग.    

पुस्तक खरेदीसाठी संपर्क -  आनंद शिंदे,  ५९५, बुधवार पेठ,  पुणे २. दूरभाष - 9881736015 ई-मेल - anand.shinde@esakal.com

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News