श्रिया पिळगावकरचा 'भंगडा पा ले '

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019

चित्रपटातील एका गाण्यासाठी श्रिया ढोल वाजवायला शिकली आहे. याबाबत श्रिया सांगते, ‘या चित्रपटात मी एका पंजाबी मुलीची भूमिका साकारत असून तिला संगीतावर विशेष प्रेम आहे.

दिग्गज अभिनेते सचिन पिळगावकर हे मराठी चित्रपटसृष्टीतले  गाजलेले व्यक्तिमत्व आहे . सगळ्यांच्या मनात आपली एक वेगळीच छबी  त्यांनी उमटवलेली. मात्र त्यांच्या पावलावर पाऊल  ठेवत त्यांची लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकरने ‘एकुलती एक’या  चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ती बॉलीवूडमध्ये ‘फॅन’ चित्रपटात तसेच ‘मिर्झापूर’ या वेबसीरिजमध्येही झळकली. 

श्रिया लवकरच ती ‘भंगडा पा ले’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात ती एका पंजाबी मुलीची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील एका गाण्यासाठी श्रिया ढोल वाजवायला शिकली आहे. याबाबत श्रिया सांगते, ‘या चित्रपटात मी एका पंजाबी मुलीची भूमिका साकारत असून तिला संगीतावर विशेष प्रेम आहे. चित्रपटातील एका गाण्यासाठी मी ढोल वाजवायला शिकली आहे. मला ढोल वाजवायला शिकताना फारच मजा आली.’

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News