श्री शिवाजी महाविद्यालयाला स्वच्छतेचा प्रथम पुरस्कार प्रदान  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 7 August 2019
  • स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मागील वर्षभर केलेल्या उल्लेखनीय व अभिनव ऊपक्रमाबद्दल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा जिल्हास्तरीय स्वच्छ भारत प्रथम पुरस्कार जाहीर
     

अकोला : श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना पथकाव्दारे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत मागील वर्षभर केलेल्या उल्लेखनीय व अभिनव ऊपक्रमाबद्दल संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा जिल्हास्तरीय स्वच्छ भारत प्रथम पुरस्कार काल अमरावती विद्यापीठात आयोजित विशेष कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचे हस्ते श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे व अकोला जिल्हा समन्वयक व कार्यक्रम अधिकारी डाॅ. संजय तिडके यांना प्रदान करण्यात आला.

यावेळी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे प्र. संचालक डॉ राजेश बुरंगे, वाशिम जिल्हा समन्वयक डाॅ शुभांगी दामले,  डाॅ नागरिक, डाॅ. प्रसाद मडावी,  कार्यक्रम अधिकारी  प्रा. संगीता शेगोकार डाॅ. गणेश खेकाळे स्वयंसेवक रोहन बुंदेले रविना वानखेडे, राहुल पाटील ऊपस्थीत होते.

महाविद्यालयाला तिसऱ्यांदा हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष अॅड गजाननराव पुंडकर, रासेयो समिती अध्यक्ष प्राचार्य केशवराव गावंडे, कार्यकारिणी सदस्य केशवराव मेतकर, वाणिज्य विभागाचे प्रमुख डाॅ एम आर इंगळे, समन्वयक डाॅ अनिल राऊत, डाॅ आशिष राऊत प्रबंधक अशोक चंदन याचेसह महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News