अभिनेता श्रेयस आता वेगळ्या भूमिकेत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 22 July 2019

आता लवकरच तो एका नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लव अमूर’ असे चित्रपटाचे नाव असून तो ‘एड्‌स’ या विषयावर आणि वास्तविक घटनेवर आधारित आहे.

अभिनेता श्रेयस पार्डीवालाने ‘सून राहा है ना’, ‘यारीया’ यांसारख्या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. ‘अघोरी’ या वेबसीरिजमध्ये तो नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आला.

आता लवकरच तो एका नवीन चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लव अमूर’ असे चित्रपटाचे नाव असून तो ‘एड्‌स’ या विषयावर आणि वास्तविक घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात श्रेयस एड्‌सग्रस्त रुग्णाची भूमिका साकारणार आहे. याबाबत श्रेयस सांगतो, ‘या चित्रपटातील माझी भूमिका मी यापूर्वी कधीही साकारलेली नाही.

माझी ही भूमिका प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस पडेल अशी माझी आशा आहे.’ येत्या नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. एका वेगळ्या भूमिकेत श्रेयसला पाहणे रंजक ठरेल. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News