श्रीपतराव कदम महाविद्यालयात विविध 100 रोपांची लागवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • वृक्ष लागवडीचा प्रारंभ प्राचार्या मंजुश्री बोबडे यांच्या हस्ते
  • पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे

खंडाळा:शिरवळ  येथील श्रीपतराव कदम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने शासनाच्या 36 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत विविध 100 रोपांची लागवड करण्यात आली. 

वृक्ष लागवडीचा प्रारंभ प्राचार्या मंजुश्री बोबडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. 

या वेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.के.एस. गागोडे, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन डॉ. राजेंद्र पवार, उपप्राचार्य एन.बी. चव्हाण, प्रा.टी.बी. आफळे, डॉ.एस.आर. सूर्यवंशी, प्रा.डॉ. सुभाष आहेर, प्रा.डॉ.डी.एन. राठोड, डॉ.आर.एस.मरे, प्रा.एस.डी. घंगाळे, प्रा. तांबिले, प्रा.डॉ.एम.एस. चव्हाण, प्रा.एस.एम. मोरे, प्रा. भास्कर रासकर आदी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.  
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News