श्रद्धाची जादू बॉक्‍स ऑफिसवर चालणार?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

२०१९ हे वर्ष अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी लकी ठरणार आहे.

२०१९ हे वर्ष अभिनेत्री श्रद्धा कपूरसाठी लकी ठरणार आहे. बहुचर्चित ‘साहो’ चित्रपटामधील श्रद्धाचा लूक रिव्हील करण्यात आला आहे. पोस्टरवरील श्रद्धाच्या हातातील बंदुक, तिच्या चेहऱ्यावरील हावभाव विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

सोशल मीडियावरही या नव्या लूकची चर्चा होताना दिसत आहे. श्रद्धाबरोबरच प्रभासही या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट हिंदीबरोबरच इतर काही भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

शिवाय श्रद्धाचे या चित्रपटातील ॲक्‍शन स्टंट विशेष लक्षवेधी असणार आहेत. श्रद्धा-प्रभासची जादू बॉक्‍स ऑफिसवर चालणार का, हे चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित झाल्यावरच समजेल. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News