श्रद्धा कपूर अडकतेय विवाहबंधनात; फोटो व्हायरल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 12 July 2019
  • आता श्रद्धा रोहन श्रेष्ठा या बॉलीवूड फोटोग्राफरला गेल्या वर्षभरापासून डेट करत आहे.
  • पुढील वर्षी हे दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अभिनेत्री श्रद्धा कपूर तिच्या खासगी आयुष्याबाबत बोलणं नेहमीच टाळते. आजवर फरहान अख्तर, आदित्य रॉय कपूर या बॉलीवूड स्टार्सशी तिचं नाव जोडलं गेलं.

पण या साऱ्या चर्चांवर मौन पाळणं तिने पसंत केलं. आता श्रद्धा रोहन श्रेष्ठा या बॉलीवूड फोटोग्राफरला गेल्या वर्षभरापासून डेट करत आहे. पुढील वर्षी हे दोघं विवाहबंधनात अडकणार असल्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

रोहन-श्रद्धाच्या लग्नाला दोन्ही कुटुंबीयांचा होकार आहे. एवढंच नव्हे; तर श्रद्धाच्या आईने श्रद्धा-रोहनच्या लग्नाच्या तयारीला सुरुवातदेखील केली आहे. मध्यंतरी शक्ती कपूर यांना एका मुलाखतीदरम्यान श्रद्धा-रोहनच्या नात्याबाबात विचारण्यात आलं होतं.

मात्र या साऱ्या अफवा असल्याचे त्यांनी म्हटले होते. लग्नाबाबात सुरू असणाऱ्या चर्चांवर श्रद्धा बोलणार का, हे पाहावं लागेल. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News