दमदार ट्रेलरचा बादशाह ‘साहो’ प्रदर्शित होणार या दिवशी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019

हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणास्तव ‘साहो’ लांबणीवर गेला आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या चाहत्यांना या चित्रपटासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.

जबरदस्त ॲक्‍शन, अवाढव्य सेट ही ‘साहो’ चित्रपटाची खासीयत. या चित्रपटाची गाणी, टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक अगदी भारावूनच गेले.

हा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता. मात्र काही कारणास्तव ‘साहो’ लांबणीवर गेला आहे. प्रभास आणि श्रद्धा कपूरच्या चाहत्यांना या चित्रपटासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. १५ नव्हे तर ३० ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

१५ ऑगस्टलाच ‘रनारंगम’, ‘इवारु’ हे दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित होत असल्याने ‘साहो’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. शिवाय ‘मिशन मंगल’, ‘बाटला हाऊस’सारखे हिंदी चित्रपटही १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News