‘जय श्रीराम’चा नारा लोकांच्या गळाभेटीसाठी की त्यांचा गळा घोटण्यासाठी : नक्वी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 26 June 2019
  • हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणार

  • फक्त गळाभेटीलाच ‘जय श्रीराम’​

नवी दिल्ली : झारखंडमध्ये माथेफिरू जमावाकडून मुस्लिम तरुणावर झालेल्या हल्ल्याची केंद्राने गंभीर दखल घेतली आहे. ‘जय श्रीराम’चा नारा लोकांची गळाभेट घेताना दिला जाऊ शकतो, त्यांचा गळा घोटताना नाही, असे वक्तव्य करत केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी या गुन्ह्यातील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचे सूतोवाच केले.

दरम्यान, झारखंडमधील सराईकेला खरस्वान जिल्ह्यामध्ये माथेफिरू जमावाने तबरेज अन्सारी या तरुणाला चोरीच्या संशयावरून जबर मारहाण करत त्याला ‘जय श्रीराम’ आणि ‘जय हनुमान’च्या घोषणा द्यायला भाग पाडले होते. केवळ गळाभेट घेतानाच ‘जय श्रीराम’चा नारा दिला जाऊ शकतो, अशा प्रकारच्या घटनांचे कधीच समर्थन करता येणार नाही. विकासाच्या अजेंड्यावर आम्ही हा विनाशकारी अजेंडा कधीच आरूढ होऊ देणार नाही, असेही त्यांनी या वेळी नमूद केले. 

सरकारने निर्माण केलेले सकारात्मक वातावरण नष्ट करणे हाच अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांचा एकमेव अजेंडा असून, आम्ही पूर्णपणे त्यांच्याविरोधात आहोत. अशा प्रकारचे क्रूर कृत्य करणाऱ्यांविरोधात सरकार कठोर कारवाई करेल, असेही ते म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News