अशीही एक मैत्रीण असावी?

शुभांगी विलास पवार, सातारा
Sunday, 4 August 2019

जन्मापासून माणूस एकटा राहूच शकत नाही, व्यक्त होणं हा त्याचा  स्थायी भाव. मनुष्य "समाजशील प्राणी" आहे, असे म्हंटले जाते. सगळी नाती, बंध याद्वारे तो जगत असतो. त्यातला एक महत्त्वाचा दुवा, अनोखे भाव विश्व जपणारे नाते म्हणजे "मैत्री"!

"एक मैत्रीण असावी,
मैत्रीची बंध असलेली,
नात्यात दुरावा असूनही,
मनाच्या कप्प्यात वसलेली......!!१!!

सारकाही मैत्रीतल,
अभंग ,अतूट असावं,
त्यातील जाणिवेत,
आपलेपण दिसावं......!!२!!

सारकाही मैत्रीण म्हणून,
जाणून घ्यावे आपुलकीने,
चूक होता काही अनावधानाने,
कान ओढावे सलगीने.....!!३!!

मैत्रीण असावी एकतरी,
जीवाला जीव देणारी,
साऱ्यांनी पाठ फिरवली तरी,
अखेरपर्यंत साथ देणारी. .....!!४!!

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News