चीनमधल्या सरकारचा धक्कादायक निर्णय ....

सकाळ वृतसेवा (यिनबझ)
Friday, 15 November 2019

व्हिडिओ गेमिंग आणि मोबाइलवर ऑनलाईन गेमिंगचे व्यसन मुलांमध्ये बर्‍याच प्रमाणात असल्याने मुलांमध्ये आरोग्याबाबत समस्या निर्माण होत आहे.

सध्याच्या जगात मोबाईल हे तरुणांसाठी जिवाभावाचे साधन बनले आहे. आजच्या  पिढीला  त्यांची  महत्वाची कामे ही मोबाईल मधून सहजतेने करता येतात . मात्र जसा फायदा असतो तसा त्याचा तोटाही आपल्याला पाहायला मिळतो. आजच्या तरुण मुलांमध्ये ह्या मोबाईलचा वापर जास्तच  होत असल्याने मुलांच्या तब्येतीवर वाईट  परिणाम होत आहे. ह्या सगळ्यातून त्यांची सुटका होणे कठीण असल्याने प्रत्येक देशा-देशांधील  सरकार आपापल्या परीने आळा  घालण्याचा प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न चीनच्या  सरकारने घेतला आहे.  

 18 वर्षाखालील मुलांसाठी ऑनलाईन खेळांवर आता बंदी घालण्यात आली आहे. १८ वर्षाखालील मुलांना रात्रीच्या वेळेस १० ते सकाळी ८ वाजेपर्यंतच्या दरम्यान ऑनलाईन गेम खेळता येणार नाही. मात्र शनिवार व रविवार आणि सुट्टीच्या कालावधीत ऑनलाईन गेम खेळण्यासाठी  केवळ तीन तास परवानगी दिली आहे. 

चीन सरकारच्या सर्व्हेनुसार ऑनलाईन गेम खेळण्यात चीन हा जगातील दुसर्‍या क्रमांकावर ,तर अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे. व्हिडिओ गेमिंग आणि मोबाइलवर ऑनलाईन गेमिंगचे व्यसन मुलांमध्ये बर्‍याच प्रमाणात असल्याने मुलांमध्ये आरोग्याबाबत समस्या निर्माण होत आहे. बरीच मुले मानेच्या दुखण्याबद्दल तक्रारी  करतात आणि बर्‍याचजणांचे डोळे खराब होत आहेत. या व्यतिरिक्त मुलांना पाठदुखीच्या तक्रारी येत आहेत.

चिनी सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, 8 ते 16 वर्षे वयोगटातील मुले ऑनलाईन गेमिंगसाठी दरमहा 200 युआन अर्थात सुमारे दोन हजार रुपये खर्च करू शकतात. त्याच वेळी, 16-18 वर्षांच्या मुलांना गेमसाठी 400 युआन म्हणजेच सुमारे चार हजार रुपये खर्च करण्याची परवानगी आहे. तसेच, ऑनलाईन गेम खेळण्यासाठी, मुलांना त्यांच्या वास्तविक नावांसह नोंदणी करावी लागेल.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News