‘राष्ट्रवादी’ची शिवस्वराज्य यात्रा २० आँगस्टला जिल्ह्यात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 16 August 2019
  • अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व खासदरा उदयनराजे भोसले या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.
  • लढा गद्दारांशी...लढा फितुरांशी...रयतेच्या राज्यासाठी व रयतेच्या हक्कासाठी शिवस्वराज्य यात्रा' असे ब्रीदवाक्य यात्रेचे आहे.

यवतमाळ: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे मंगळवारी (६ ऑगस्ट) शिवनेरीहून सुरू करण्यात आली. शिवस्वराज्य यात्रा तेथून निघाल्यावर मंगळवार (२०) आँगस्ट कारंजा मार्गे जिल्ह्यात येणार आहे. यात्रा रोड शो, नागरिकांशी संवाद, कॉर्नर बैठका व जाहीर सभा घेणार आहे.

नव्याने खासदार झालेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व खासदरा उदयनराजे भोसले या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत. यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी जिल्हात राष्ट्रवादीने सुरू केली आहे. 'लढा गद्दारांशी...लढा फितुरांशी...रयतेच्या राज्यासाठी व रयतेच्या हक्कासाठी शिवस्वराज्य यात्रा' असे ब्रीदवाक्य यात्रेचे आहे.

 ६ रोजी शिवनेरीहून सुरुवात झाल्यानंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापुरामुले यात्रा स्थगित करण्यात आली होती. जिल्ह्यात २० आँगस्टला यात्रा येणार आहे. दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे तिचे स्वागत होणार आहे. त्यानंतर रोड शो, नागरिकांशी संवाद साधत यात्रा यवतमाळ विधानसभा मतदारसंघात प्रवेश करणार आहे. 

यात्रा शिवनेरी ते रायगड अशी राज्यभरातून फिरणार आहे. या यात्रेत खासदार डॉ. अमोल कोल्हे व खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे सहभागी होणार आहेत.

शिवस्वराज्य यात्रेच्या या दौऱ्यांनिमित्त जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी जिल्हा राष्ट्रवादीने केली आहे. यात्रेत युवक, युवती, महिला, नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप बाजोरीया यांनी केले आहे.

नेते साधणार संवाद 

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा जिल्हात येणार आहे. यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते सहभागी होणार आहेत. यात्रा तसेच सभांमधून खासदार डाँ अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे नागरिकांशी संवाद साधणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News