शिवसेनेचे पिकविमा आंदोलन टक्केवारी आणि हप्ता वसूलीसाठी: संभाजी ब्रिगेड

राजेभाऊ मोगल 
Wednesday, 17 July 2019
  • सत्तेत असूनही जर विमा कंपन्यांवर नियंत्रन नसेल आणि शेतकऱ्यांना पीक विम्याचे सरसकट वाटप होत नसेल तर यामध्ये आर्थिक घोटाळा झाला
  • विमा कंपन्यांकडून पाहिजे तेवढी टक्केवारी मिळत नसल्यामुळे शिवसेना राज्यात शेतकऱ्यांच्या "पिक विम्या"साठी आंदोलन करते​

औरंगाबाद - सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळालेला नाही. दरम्यान, शिवसेनेनी पिकविमा कंपन्यांच्या विरोधात केलेले आंदोलन म्हणजे विमा कंपन्यांकडून मिळणाऱ्या "टक्केवारीचा हप्ता वसुली आंदोलन आहे, असा गंभीर आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्‍ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केला आहे. सत्तेत असूनही जर विमा कंपन्यांवर नियंत्रन नसेल आणि शेतकऱ्यांना पीक विम्याचे सरसकट वाटप होत नसेल तर यामध्ये आर्थिक घोटाळा झाला असण्याची शक्‍यता आहे. 

विमा कंपन्यांकडून पाहिजे तेवढी टक्केवारी मिळत नसल्यामुळे शिवसेना राज्यात शेतकऱ्यांच्या "पिक विम्या"साठी आंदोलन करते, असा आरोप प्रसिद्धी  पत्रकाव्दारे डॉ. भानुसे यांनी केला आहे. शेतकऱ्यांना पिक विमा देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या विमा कंपन्यांचे कंत्राट रद्द करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मुग, उडीद, सोयाबीन व ज्वारी या खरीप पिकासाठी पिक विमा यातील जाचक अटी तात्काळ रद्द करून सरसगट सर्व पीडित शेतकऱ्यांना तात्काळ शंभर टक्के पिक विमा देण्यात यावा, अन्यथा राज्यभर आंदोलने करण्यात येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News