शिवसेनेचे ‘पहले सरकार, फिर मंदिर’; उद्धव ठाकरेंचा खासदारांसह 'या' तारखेला अयोध्या दौरा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या अगोदर अयोध्येला जाऊन ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा देणाऱ्या शिवसेनेने आता केंद्र सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पुन्हा अयोध्या वारी करण्याची घोषणा केली आहे. राज्यात शिवसेनेचे १८ खासदार विजयी झाल्यानंतर प्रचंड आनंदात असणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांसह देवदर्शन सुरू केले आहे. १५ जूनला ते सर्व नवनिर्वाचित खासदारांच्या सोबत अयोध्येला प्रभू रामचंद्रांच्या चरणी आशीर्वाद घ्यायला जाणार आहेत.

या अगोदरचा ठाकरे यांचा अयोध्या दौरा गाजला होता. मंदिर उभारणीत शिवसेना आक्रमक असल्याचे चित्र देशभरात निर्माण झाले होते. संत-महंतांच्या सोबत त्यांनी चर्चा केली होती. शरयु नदीच्या किनारी भव्य-दिव्य आरतीचे आयोजनदेखील करण्यात आले होते. ‘पहले मंदिर, फिर सरकार’ अशी घोषणा देत ठाकरे यांनी भाजपची कोंडी केली होती. शिवसेना लोकसभा निवडणुकीत युती करणार की नाही, या चर्चेने राजकारण ढवळून निघाले होते. मात्र, त्यांनी युती करीत शिवसेनेचे १८ खासदार निवडून आणले.

आता पुन्हा अयोध्येला जाऊन राम मंदिर उभारणीसाठी शिवसेना आक्रमक होण्याचे सूतोवाच मिळत आहेत. या वेळी ठाकरे हे १८ खासदारांसह राम मंदिर उभारणीचा शंखनाद करतील, अशी अटकळ बांधली जात आहे. लोकसभा विजयानंतर सर्व खासदारांसह ठाकरे यांनी कार्ला येथील कुलस्वामिनीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरलाही अंबाबाईच्या दर्शनासाठी सर्व खासदारांसोबत गेले होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News