भाजपच्या नगरसेवकांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना रोखले

सकाळ वृत्तसेवा ( यिनबझ )
Friday, 16 August 2019

ठाणे महापालिकेच्या सुविधा भूखंडावर साकारण्यात आलेल्या उद्यानाचा लोकार्पण सोहळा पाच महिन्यात दुसऱ्यांदा आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाजप नगरसेवकांनी उद्यानाच्या नामकरणावरून थेट युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना रोखल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. 

पाच महिन्यानंतर उद्यानाचे स्वर्गीय वसंत डावखरे यांचे नाव बदलून 'वनस्थळी उद्यान' असं नाव देण्यात आले. उद्यानाचे आज युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि आदित्य ठाकरे कार्यक्रम स्थळावरुन बाहेर पडताना ठाणे महानगरपालिकेचे भाजपचे गटनेते नारायण पवार आणि इतर नगरसेवकांनी आदित्य ठाकरे यांना रोखलं. त्या उद्यानाचे पाच महिन्यांपूर्वी भाजपाचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी उद्घाटन केले होते.

यामुळे ठाण्यात शिवसेना-भाजपमध्ये किती वाद सुरू आहेत, ते पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे.अखेर प्रसार माध्यामांसमोर सेना-भाजपमधील मतभेद समोर येऊ नयेत यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली. 'उद्यानाचे नाव वसंत डावखरेच राहिल. तसा ठराव पालिकेत मंजूर करुन घेऊ. मात्र आधी झालेले उद्घाटन अनौपचारिक होते हे उद्घाटन औपचारिक आहे, अशी समजूत एकनाथ शिंदे यांना काढावी लागली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News