शिवप्रसाद सदानंद जायसवाल कॉलेजकडून पुरग्रस्तांना अन्नधान्याची मदत 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 18 August 2019

अर्जुनी मोर - शिवप्रसाद सदानंद जायसवाल कॉलेज, अर्जुनी मोर येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राज्यातील पुरग्रस्तांना अन्नधान्याची मदत पाठविण्यात आली. 

महाराष्ट्रातील कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमूळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बचाव कार्य आता संपत आले असले तरी छावण्यांमध्ये असलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू लष्कराकडून पुरविण्यात येत आहेत. 

शासनासोबत अनेक सेवाभावी संस्थादेखील आपल्या परीने शक्य ती मदत देत आहेत. पुराचं पाणी कमी झाल्याने रोगराई पसरू न देण्याचे मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. या पुरामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 8 व सांगलीतील 4 तालुक्यातील अनेकांच्या घराचं व शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. 

त्यांच्याजवळ उदरनिर्वाहासाठी अन्नधान्य देखील राहिलेले नाही. अशा बिकट परिस्थितीत पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी एस एस जयस्वाल कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आपल्यापरीने अन्नधान्य गोळा करून पुरग्रस्तांना मदत पाठविण्याचे ठरविले.

कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. आर. दर्वे, डॉ. पी. आर. भानसे, डॉ. एस. बी. बोरकर व प्रा. आशिष कावळे यांनी विद्यार्थ्यांना याची जाणीव करून दिली, विद्यार्थांनी याला उत्तम प्रतिसाद देत तांदूळ, गहू व डाळ असे एकूण 2 क्विंटल 10 किलो अन्नधान्य गोळा केले व पुरग्रस्तांना पाठविण्यात आले. आपल्या लोकांना या नैसर्गिक आपत्तीतून बाहेर काढण्यासाठी केलेली ही मदत खरेच कौतुकास्पद आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News