मंत्रिपदाच्या हव्यासापोटी शिवेंद्रराजे भाजपात, या नेत्याचा आरोप

सकाळ (यिनबझ)
Thursday, 29 August 2019

भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या सर्वांची निष्ठा पाहिल्याशिवाय मंत्रिमंडळ न देण्याचा फतवा काढला, तर शिवेंद्रराजे काय करतील? असाही खोचक सवाल

सातारा : निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना-भाजपमध्ये सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीसहीत इतर पक्षांतील असंतुष्ट नेत्यांची 'मेगाभरती' सुरु आहे. आणि आपल्या पक्षातून बड्या नेत्याचे निघून जाणे पक्षांतील वरिष्ठ नेत्यांच्या पचनी पडेलच असे नाही !

आधीच साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर अनुपस्थित राहिल्यामुळे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या पोकळीला नाराज नेत्यांच्या इतरत्र पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीच्या झालेल्या शिवस्वराज्य यात्रेला कोणा खंबीर नेत्याचे नेतृत्व नाही. म्हणून आता सभेत पक्षांतर केलेल्या नेत्यांची खिल्ली उडविली जात आहे.

मंत्रिपदाच्या शुल्लक तुकड्यासाठी शिवेंद्रराजे भोसले भाजपमध्ये गेले, अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली. भाजपने राष्ट्रवादीतून आलेल्या सर्वांची निष्ठा पाहिल्याशिवाय मंत्रिमंडळ न देण्याचा फतवा काढला, तर शिवेंद्रराजे काय करतील? असा खोचक सवालही जयंत पाटलांनी विचारला.

राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा साताऱ्यात दाखल झाली. सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, रुपाली चाकणकर, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील यांच्यासह जिल्हयातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘वारे बदलल्यावर पक्ष बदलणारे पुन्हा माघारी पक्षात येऊ शकतात. कोणतंही संकट येऊ नये, म्हणून काही पक्ष बदलतात. ज्यांच्यात लढण्याची ताकद, मानसिकता नाही, जे कायम घड्याळाच्या चिन्हावर निवडून आले त्यांनी पक्ष बदलावा.’ असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

या सभेत अमोल कोल्हे यांनीही  खासदार उदयनराजेंवर अप्रत्यक्ष टीका केली. तुमच्याकडे आम्ही आदराने बघत होतो. तुम्ही कोणाच्या मांडीला मांडी लावून बसायला निघाला आहात, असा टोला लगावला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News