शिवसेनेचा स्टार प्रचारक: डॉ. शिवरत्न शेटे

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 11 October 2019

तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या डॉ. शिवरत्न शेटे त्यांच्या व्याख्यानाला मोठा जनसमुदाय उसळतो. तब्बल २० वर्षांपासून शिवरायांची शौर्यगाथा जनतेपुढे मांडण्याचे काम डॉ. शेटे तन्मयतेने करत आहेत.

आपल्या उक्ती आणि कृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा जगासमोर मांडणारा अवलिया शिवचरित्रकार, जेष्ठ अभ्यासक डॉ. शिवरत्न शेटे यंदा विधानसभा निवणुकीत स्टार प्रचारक म्हणून भुमिका बजावणार आहेत. शिवसेना पक्षाने प्रचारासाठी भारतीय निवडणूक आयोगासाठी एक यादी जाहीर केली आहे. त्यात डॉ. शिवरत्न शेटेसह वीस नेत्यांचा समावेश आहे.
 

तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या डॉ. शिवरत्न शेटे त्यांच्या व्याख्यानाला मोठा जनसमुदाय उसळतो. तब्बल २० वर्षांपासून शिवरायांची शौर्यगाथा जनतेपुढे मांडण्याचे काम डॉ. शेटे तन्मयतेने करत आहेत. खेडे, तांडा, वाडी, वस्ती, पाड्यापासून ते मैट्रो शहरापर्यंत दोन हजारांहून अधिक व्याख्याने केली आहेत. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक गड किल्ले बांधण्यात आले, त्यांच्या किल्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे काम विविध माध्यातून करत आहेत.
 

महाराष्ट्र दौरा
शिवसेना पक्ष विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. दौऱ्यांच्या प्रचारांची धूरा डॉ. शिवरत्न शेटे यांच्या खांद्यावर असणार असून स्टार प्रचारक म्हणून ते भूमिका बजावणार आहेत. 
 

किल्ले मोहिम 
फक्त शिवरायांचा इतिहास सांगून चालणार नाही तर उक्तीला कृतीची जोड दिली पाहिजे म्हणत शिवप्रेमींना सोबत घेऊन गडकोटांची भ्रमंती व अनुभवाद्वारे अभ्यासाची मोहीम त्यांनी हाती घेतली. तसेच 'हिंदवी परिवार' नावाची संस्था स्थापन केली होती. संस्थेच्या माध्यमातून शेकडो शिवप्रेमींना साथीला घेऊन ते गडकोटांची भ्रमंती करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेल्या पावनखिंडीपासून तामिळनाडूतील जिंजी किल्ल्यापर्यंतच्या प्रत्येक ठिकाणी पायपीट करताना आजवर गडकिल्ल्यांच्या शंभराहून अधिक मोहिमा त्यांनी यशस्वी केल्या आहेत. 
 

शिवसह्याद्री आरोग्यधाम
वैद्यकीय क्षेत्रातील पदवी प्राप्त करुन जनसेवेसाठी सोलापुरात शिवसह्याद्री आरोग्यधाम स्थापन केले आहे. त्याच्या माध्यमातून अनेकांना आरोग्यसेवा उपलब्ध करुन दिली जात आहे. 

शिवसेना! महाराष्ट्राची अस्मिता! छत्रपती शिवरायांच्या १८पगड जातीची फक्त हिंदुत्वाच्या भगव्या झेंड्याखाली एकत्रीत मांदियाळी म्हणजे शिवसेना!!  भुमीपुत्रांचा पक्ष, हिंदुत्व नसानसांत, आजही कोणावरही अन्याय होऊ द्या, इतके पक्ष असताना पहिली आठवण येते... ती शिवसेनेची! सामान्य घरातील... शिवसैनिकांना सत्तास्थानी बसविणारा, जातपात न मानणारा पक्ष..! 
केंद्रात जशी भाजपची गरज तशीच महाराष्ट्रात  शिवसेनेची! शिवरायांच्या व बाळासाहेबांच्या विचाराचा झंझावात मी महाराष्ट्रभर करून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणार!

-डॉ. शिवरत्न शेटे, एम. डी (आयुर्वेद) तथा शिवचरित्र व्याख्याता
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News