भाजपला 17 दिवस तर सेनेला फक्त 24 तास; राज्यापालांच्या निर्णयाविरोधात सेना कोर्टात जाणार !

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019

सत्तास्थापनेसाठी भाजपला 17 दिवस देण्यात आले तर शिवसेनेला मात्र 24 तासांची मुदत देण्यात आली.

मुंबई-राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये. त्यामुळे आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होेते की काय ? असा प्रश्न सर्वानांच पडलेला आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपला 17 दिवस देण्यात आले तर शिवसेनेला मात्र 24 तासांची मुदत देण्यात आली. या निर्णयाविरुद्ध शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळतेय. 

 

शिवसेनेने राष्ट्रपती राजवटीच्या निर्णयाला कोर्टात आव्हान द्यायचं ठरवलं आहे. काँग्रेसचे नेते आणि वकील कपिल सिब्बल याच्यांशी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संवाद साधला. ते कोर्टात शिवसेनेची बाजू मांडतील, अशीही बातमी आहे. सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी काँग्रेसचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न केला पण हा पाठिंबा मिळू न शकल्याने शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा फोल ठरला. आता मात्र काँग्रेसचेच नेते कपिल सिब्बल शिवसेनेच्या बाजूने कायदेशीर लढाई लढणार आहेत.

कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास असमर्थ ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट अटळ आहे, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे.केंद्रीय मंत्रिमंडळ राज्यपालांची शिफारस स्वीकारतील, अशी चिन्हं आहेत. पंतप्रधानांच्या ब्राझील दौऱ्यापूर्वीच राष्ट्रपती राजवटीचा निर्णय होईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News