शिवसेनेकडून लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा ; भावना गवळींचे नाव चर्चेत

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

शिवसेनेकडून लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा करण्यात आला आहे. हा आमचा नैसर्गिक हक्क आहे. बऱ्याच काळापासून आमची ही मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे आतातरी आम्हाला लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळालेच पाहिजे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले. 

 

शिवसेनेकडून लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा करण्यात आला आहे. हा आमचा नैसर्गिक हक्क आहे. बऱ्याच काळापासून आमची ही मागणी प्रलंबित आहे. त्यामुळे आतातरी आम्हाला लोकसभेचे उपाध्यक्षपद मिळालेच पाहिजे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले. 

 

मंत्रिपदाची संधी न दिल्यामुळे नाराज झालेल्या खासदार भावना गवळी यांची नाराजी लवकरच शिवसेनेकडून दूर केली जाण्याची शक्यता आहे. सलग पाचव्यांदा लोकसभेत निवडून जाऊनही संधी न मिळाल्याने भावना गवळी नाराज होत्या. मात्र, आता उपाध्यक्षपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पुढे येत आहे. भावना गवळी यांच्याकडे गटनेतेपद सोपवले जाण्याचा विचार होता. परंतु, भावना गवळींनी हे पद गवळींनी नाकारले होते.

दाच्या निवडणुकीत त्यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या माणिकराव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रवीण पवार यांचा दणदणीत पराभव केला होता. त्यामुळे भावना गवळी यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, 'मातोश्री'ने अरविंद सावंत यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकल्याने भावना गवळी नाराज झाल्या होत्या. भावना गवळी यांच्याबरोबरच शिवसेनेच्या मुंबई बाहेरील खासदारांमध्ये मात्र नाराजी असल्याचे दिसून आले होते.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News