भाजपाचे अमित शहांमुळे शिवसेना नाराज

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019
  • रविवारी झालेली या बैठकीनंतर शिवसेनेला  अस्वस्थता आहे.  
  • लोकसभेमध्ये जशी मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी साह्य केले, तसेच आता येत्या विधानसभेमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री बनवण्यास मदत करावी.
  •  शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात  एक पद देऊन त्यांना शांत केले होते,

दिल्ली: दिल्लीत झालेली भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीमध्ये अमित शाहा यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून  शिवसेना कुठेतरी नाराज झालेली दिसून येते. रविवारी झालेली ही बैठक शिवसेनेला  अस्वस्थत करणारी आहे. या बैठकीमध्ये अमित शाह यांनी विधानसभा निवडणूकी बाबत म्हणाले, विधानसभेमध्ये शिवसेना आणि भाजपाची युती राहणार पण मुख्यमंत्री पदी भाजपाच असायला हवा, त्यांच्या  वक्तव्यावरून शिवसेनेत नाराजी पसरली आहे. 

लोकसभेमध्ये जशी मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी साह्य केले, तसेच आता येत्या विधानसभेमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री बनवण्यास मदत करावी. आपली युतीतर राहणारच आहे. फक्त आपल्या जागा निवडून आणण्यासाठी नव्हेतर आपल्या मित्रपक्षाला मदत करून जागा निवडून द्यावे, अशी सूचना अमित शाहांनी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांना दिली, यामुळे शिवसेना खूपच नाराज आहे, असे दिसून येत आहे. 

तसेच शिवसेनेला केंद्रीय मंत्रिमंडळात सुद्धा एक पद देऊन त्यांना शांत केले होते, ही नाराजी आहे. असे सुद्धा बोले जात आहे. पण यासर्व गोष्टींचे खंडन हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केले आहे. तसेच आम्ही लोकसभा उपाध्यक्षपद हे शिवसेनेला द्यावे ही मागणी केली आहे.  

चंद्रकांत पाटील यांच्या युतीच्या फॉर्मुल्यावर शिवसेना नाराज होती, त्यांनंतर आता अमित शाह यांचे हे वक्तव्य या नाराजगीमध्ये भर पडलेली दिसून येत आहे. यापुढे शिवनेचे काय पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News