संजय राऊतांना शिवसैनिकच मजबूत चोपतील' ; पाहा कोणी केलं ट्विट ?

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Monday, 11 November 2019

 दोनच दिवसांपूर्वी ‘संजय राऊत इतके गरीब आहेत, की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेले. बाकीचं राहू द्या, अगोदर त्यांना कुणीतरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या, असं म्हणत टिका केली होती. 

मुंबई : सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडीत सोशल मीडियावर देखील अनेक मिम्स, जोक्स फिरत आहेत. ज्याप्रमाणे संजय राऊतांना शिवसेनेचा चाणक्य म्हणून सोशल मीडियावर संबोधलं जात आहे त्याचप्रमाणे आता त्यांच्यावर टीका करणारे काही मेसेज देखील व्हायरल होऊ लागले आहेत. अशाच एका व्हॉट्सअॅप मेसेजपैकी एक मेसेज निलेश राणे यांनी थेट आपल्या ट्वीटर अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यात थेट संजय राऊतांवर टीका करण्यात आली आहे. पाहा काय ट्वीट केलं आहे निलेश राणेंनी. 

 

 ‘मला तर वाटतंय येत्या काही दिवसांत संजय राऊत यांना शिवसैनिकच मजबूत चोपून काढतील’ असं ट्वीट करत काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.  दोनच दिवसांपूर्वी ‘संजय राऊत इतके गरीब आहेत, की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेले. बाकीचं राहू द्या, अगोदर त्यांना कुणीतरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या, असं म्हणत टिका केली होती. 

 

राणे कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांच्यातील वाद तसा जुना नाही. नारायण राणेंनी राज्यात सत्तास्थापनेवरुन संघर्ष सुरु असताना शिवसेनेवर टीका करणं टाळलं होतं. परंतु निलेश राणे यांनी तिखट भाषेत समाचार घेतला आहे.  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News