शिल्पा शेट्टी तेरा वर्षांनंतर दिसणार चित्रपटात; या चित्रपटाद्वारे कमबॅक करणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019

अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चित्रपटांत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. शिल्पा काही काळ चित्रपटांपासून दूर होती. बारावर्षांपूर्वी 'अपने' आणि 'लाईफ इन मेट्रो' या चित्रपटात ती अखेरची झळकलेली होती.

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा एकदा चित्रपटांत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. शिल्पा काही काळ चित्रपटांपासून दूर होती. बारावर्षांपूर्वी 'अपने' आणि 'लाईफ इन मेट्रो' या चित्रपटात ती अखेरची झळकलेली होती. पण आता शिल्पाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी असून शिल्पा तेरा वर्षांनतंर चित्रपटात दिसणार आहे. याबाबत चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्वीट करून माहिती दिली. शिल्पा लवकरच 'निक्कमा' या चित्रपटांने कमबॅक करणार आहे.<

>

'निक्कमा' चित्रपटाचे दिग्दर्शन शबीर खान करणार असून चित्रपटात अभिमन्यू दासानी आणि शिरले सेतिया मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शिल्पा शेट्टीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत असणार असल्याचे म्हटले जात आहे. शिल्पाने या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली असून पहिल्याच दिवशी तीचे उत्साहात स्वागत केलं गेलं. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल.

सर्वात फिट अभिनेत्री

फिटनेसच्या बाबतीत तिने अनेक अभिनेत्रीना मागे टाकलं आहे. फिट राहण्यासाठी शिल्पा योगा करते.  
शिल्पा बॉलिवूडची सर्वात फिट अभिनेत्री एक आहे. शिल्पा तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम अकाउंटवर योगा आणि  एक्‍सरसाइजचे अनेक व्हिडिओ शेअर करत असते. 

'आग' चित्रपटामुळे प्रसिद्धी 

शिल्पा शेट्टीचा जन्म ८ जून १९७५ ला मॅंगलोर, कर्नाटकमध्ये झाला. शिल्‍पा मुंबईमधील चेंबूर च्या एंथनी गर्ल्‍स हायस्‍कूल मध्ये होती आणि पुढे पोद्दार कॉलेजमधून शिक्षण केलं. तिने भरतनाट्यमचं ही शिक्षण घेतलं आहे. शिल्पा शेट्टीने 'बाजीगर' या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने त्यानंतर एकाहून एक हिट चित्रपट दिले. तिने धडकन, रिश्ते, गर्व, मैं खिलाडी तू अनाडी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. शिल्पाने हिंदी बरोबर तेलगू सिनेमा आणि कर्नाटक सिनेमातील सुमारे चाळीस चित्रपटांत काम केलं आहे. 'आग' या  हिंदी चित्रपटामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News