'या' चित्रपटातुन शिल्पा करते बॉलिवुडमध्ये कमबॅक

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019

काही वर्षे चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर शिल्पा आता पुन्हा चित्रपटसृष्टीत कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे​

मुंबई :  अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे ‘धडकन’, ‘मै खिलाडी तू अनाडी’सारखे अनेक चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर गाजले. त्यानंतर छोट्या पडद्यावर ‘सुपर डान्सर्स’ या डान्स रिॲलिटी शोमध्ये ती परीक्षक म्हणून प्रेक्षकांसमोर आली. ‘अपने’ चित्रपटानंतर तिने चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला होता. काही वर्षे चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्यानंतर शिल्पा आता पुन्हा चित्रपटसृष्टीत कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे.

लवकरच ती ‘निकम्मा’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. याबाबत शिल्पा म्हणते, ‘मी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. या चित्रपटातील माझी भूमिका फारच वेगळी आहे. याआधी कधीही मला अशाप्रकारची भूमिका ऑफर झाली नव्हती.’ दिग्दर्शन शब्बीर खान यांनी केले आहे.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News