शिखर धवन विश्वचषकातून ३ आठवड्यांसाठी बाहेर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात जखमी भारतीय सलामीवीर शिखर धवन विश्वचषकातून ३ आठवड्यांसाठी बाहेर.

 

 

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात जखमी भारतीय सलामीवीर शिखर धवन विश्वचषकातून ३ आठवड्यांसाठी बाहेर.

भारतीय संघाला मोठा धक्का : टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे तीन आठवड्यांसाठी विश्वचषकातून बाहेर पडला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात धवनच्या बोटाला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. 

भारत- पाक सामन्यास मुकला : विश्वचषकात भारताचा तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध 13 जून रोजी होणार आहे. या सामन्यात शिखर धवन खेळू शकणार नाहीच. पण त्यापुढचा पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यालाही शिखर धवन मुकणार आहे. भारत - पाकिस्तान यांच्यात 16 जून रोजी मँचेस्टर इथं सामना होणार आहे.

सलामीवीर कोण? : धवनच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासोबत सलामीला के एल राहुल. खेळण्याची शक्यता आहे. राहुलशिवाय विराट कोहलीनेही आयपीएलमध्ये सलामीला येऊन मोठ्या खेळी केल्या आहेत.

शिखर धवनच्या अनुपस्थितीत रवींद्र जाडेजा किंवा विजय शंकर या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते.

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News