शेहला रशीद बिनबुडाचे आरोप करते, आईचा संताप डोक्यात आहे तिच्या..

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 19 August 2019
  • जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर सरकारकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. येथील इंटरनेट व दूरध्वनी सेवा बंद आहेत. मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात आहेत. यावरून शेहला रशीदने ट्विट करत भारतीय लष्करावर आरोप केले आहेत.
  • वान मुद्दाम रेशन फरशीवर फेकून देत आहेत आणि तांदळामध्ये तेल टाकून देत आहेत. ​

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील परिस्थितीवरून जेएनयूची माजी विद्यार्थिनी शेहला रशीद हिने भारतीय लष्करावर केलेले आरोप निराधार असल्याचे स्पष्टीकरण लष्कराकडून देण्यात आले आहे. भारतीय लष्करावर आरोप केल्याने ट्विटरवर #arrestShehlaRashid हा ट्रेंड सुरु आहे.

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर सरकारकडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. येथील इंटरनेट व दूरध्वनी सेवा बंद आहेत. मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात आहेत. यावरून शेहला रशीदने ट्विट करत भारतीय लष्करावर आरोप केले आहेत. भारतीय लष्कराचे जवान काश्मीरमधील नागरिकांच्या घरांमध्ये जबरदस्तीने घुसून युवकांना ताब्यात घेत आहे, तसेच त्यांच्या घरात तोडफोडही करत आहे. जवान मुद्दाम रेशन फरशीवर फेकून देत आहेत आणि तांदळामध्ये तेल टाकून देत आहेत. 

शेहलाचे हे सर्व आरोप निराधार असल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. तेथील परिस्थितीचा आढावा न घेता लष्करावर हे चुकीचे आरोप करण्यात येत आहेत, असे लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शेहलाने रविवारी काश्मीरमधील परिस्थितीवर सलग 10 ट्विट केले होते. शेहलाच्या आरोपांवरून ट्विटरवर तिला अटक करण्याची मागणी होत आहे.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News