दोन्ही हात नसुन तिने गाठला ६५ टक्क्यांचा पल्ला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 9 June 2019
  • मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा घेण्यात आली होती.
  • या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले होते. दिनांक ८ जून रोजी दहावीचा निकाल लागला

पाटण - मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रात दहावीच्या परीक्षा घेण्यात आली होती . या परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले होते. निकालाच्या तारखेविषयी सोशल मीडियावर अफवा पसरत होत्या. शेवटी दिनांक ८ जून रोजी दहावीचा निकाल लागला. महाराष्ट्र राज्याचा निकाल ७७ टक्के लागला. गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी १२ टक्क्यांनी घट झाली. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही मुलींनीच बाजी मारली. 

यामध्येही विशेष म्हणजे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये मोरणा विद्यालयाच्या अर्चनाचे सिदू यमकरचे यश. त्याच कारण म्हणजे अर्चना अपंग विद्यार्थिनी आहे, तिला दोन्ही हात नसताना सुद्धा दहावीची परीक्षा द्यायची तयारी दर्शिवली. डोक्यावर वडिलांचे छात्र नसताना सुद्धा तिने परिस्थतीवर मात करत जिद्दीने दहावीच्या परीक्षेमध्ये ६५ टक्के गुण मिळवले. 

अर्चना पाटण तालुक्या मधील गवळीनगर (कोकिसरे) येथे राहत असून तिच्यावरील वडिलांचे छत्र नाही. तिचे पालन पोषणाची सर्व जबाबदारी तिच्या आईला पाहावी लागते. 

अर्चनाच्या या जिद्दीला सलाम

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News