प्रवक्ते ते पहिली महिला पूर्णवेळ अर्थमंत्री असा आहे सुंदर प्रवास...

निवृत्ती बाबर
Sunday, 7 July 2019

२०१४ च्या मंत्री मंडळामध्ये मनोहर पर्रीकर हे संरक्षण मंत्री होते. ते गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे ३ सप्टेंबर २०१७ पासून निर्मला सीतारामन यांनी भारताच्या संरक्षणमंत्री म्हणून काम केले.

निर्मला सीतारामन या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत. १९७० साली इंदिरा गांधी या पंतप्रधान होत्या. त्यावेळेस त्यांनी अर्थमंत्री हे पद त्यांच्या जवळ होते. त्यावेळेस इंदिरा गांधी यांनी देशाचे आर्थिक बजेट सादर केले होते. त्यांनतर तब्बल ४९ वर्षांनी भारताला पूर्ण वेळ महिला अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमन लाभल्या आहेत. 

...तर जाणून घेऊया निर्मला सीतरामन यांच्याविषयी अधिक माहिती
निर्मला सीतारमण यांचा जन्म १८ ऑगस्ट १९५९ रोजी तमिळनाडूतील मदुराई येथे नारायणन सीतारामण आणि सावित्री या दांपत्त्याच्या पोटी झाला. नारायणन हे रेल्वेत नोकरीला होते. त्यामुळे निर्मला यांचे बालपण वेगवेगळ्या शहरांत गेले. त्यांचे शालेय शिक्षण मद्रास आणि तिरुचिरापल्ली येथे पूर्ण झाले. 

तिरुचिरापल्ली येथील सीतालक्ष्मी रामस्वामी महाविद्यालयातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. पदवी प्राप्त केली आणि पदव्युत्तर पदवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून प्राप्त केली. या भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत.

२०१४ च्या मंत्री मंडळामध्ये मनोहर पर्रीकर हे संरक्षण मंत्री होते. ते गोव्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे ३ सप्टेंबर २०१७ पासून निर्मला सीतारामन यांनी भारताच्या संरक्षणमंत्री म्हणून काम केले. त्यापूर्वी सीतारामन यांनी अर्थ राज्यमंत्री आणि वाणिज्य व उद्योग मंत्री म्हणून स्वतंत्रपणे काम केले आहे. त्याआधी, त्यांनी भारतीय जनता पक्षासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या म्हणून काम केले आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News