शरद पवार राष्ट्रीय नेते नसून ते केवळ बारामतीचे नेते : प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार हे आता राष्ट्रीय नेते राहिले नसून ते केवळ बारामतीचे नेते राहिल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. आंबेडकर गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामधाम येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

यावेळी ऍड.आंबेडकर बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला काँग्रेसची मते मिळाली नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा शेवट जवळ आला असे यावेळी ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मते आमच्याकडे आले नाहीत. मुस्लिम समाज आणखी आमच्याबरोबर आला तर आम्ही ३० टक्क्यांवर येऊ असा विश्वास व्यक्त केला. आम्ही आता विधानसभेची तयारी करत आहोत. विधानसभेला काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा आम्हीच प्रमुख विरोधक आहोत. असे ऍड.आंबेडकर पत्रकार परिषदेत म्हणाले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News