जे लोक म्हणतात शरद पवार आमच्या ह्रदयात..त्यांचे ह्रदय तपासावे लागेल

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 1 August 2019

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशापूर्वी त्यांनी शरद पवार आजही आपल्या ह्रदयात आहेत, असे म्हटले होते.

सातारा : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या प्रवेशापूर्वी त्यांनी शरद पवार आजही आपल्या ह्रदयात आहेत, असे म्हटले होते. त्यानंतर शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपत प्रवेश केला. 

या सर्व घडामोडींच्या संदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले, साताऱ्याची जागा राष्ट्रवादी काँग्रेस राखेल, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. जे लोक म्हणतात शरद पवार आमच्या ह्रदयात आहेत. त्यांचे ह्रदय तपासावे लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिवेंद्रसिंह राजे भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपत प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला आमदारकीचा राजीनामाही दिला. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हे वक्तव्य केले होते. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News