'संत रामदास' मधून शंतनू प्रेक्षकांच्या भेटीला.

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 17 October 2019

संत रामदास स्वामींची भूमिका तो साकारणार आहे. उद्‌बोधक आणि प्रेरणादायी कथा असलेला हा चित्रपट दिग्दर्शक संतोष तोडणकर यांनी दिग्दर्शित केला आहे.

‘कॅरी ऑन मराठा’, ‘रणभूमी’ यासारख्या चित्रपटातून अभिनेता शंतनू मोघे प्रेक्षकांसमोर आला आहे. त्यानंतर बरीच वर्ष शंतनू चित्रपटसृष्टीपासून लांबच होता. आता पुन्हा एकदा लवकरच तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला येत आहे.

‘श्री राम समर्थ’ या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणारअसून या चित्रपटात संत रामदास स्वामींची भूमिका तो साकारणार आहे. उद्‌बोधक आणि प्रेरणादायी कथा असलेला हा चित्रपट दिग्दर्शक संतोष तोडणकर यांनी दिग्दर्शित केला आहे. ‘विप्र एंटरटेनमेंट’च्या अश्‍विनी माहेश्‍वरी आणि ‘दिशादीपा फिल्म्स’च्या दीपा सुरवसे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या १ नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होईल.

शंतनूसोबत या चित्रपटात अभिनेता सयाजी शिंदे, महेश कोकाटे, सौरभ गोखले, प्रकाश सुरवसे, हृदयनाथ राणे, करण बेंद्रे, अभिनेत्री अलका कुबल, विजया सुमन, बालकलाकार अद्वैत राईलकर आणि बरेच नवोदित चेहरे पाहायला मिळणार आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News