या अभिनेत्रीला 'रायफल शुट'ची आवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019
  • ‘रेस’, ‘हेट स्टोरी’, ‘जय हो’ या चित्रपटांमधून बॉलीवूड अभिनेत्री डेझी शहाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.
  • आता ती रायफल शूटिंगच्या स्पर्धेतही सहभागी होणार आहे.
  • ‘पॉईंट २२’ या रायफल शूटिंगच्या स्पर्धेसाठी ती सज्ज झाली आहे

‘रेस’, ‘हेट स्टोरी’, ‘जय हो’ या चित्रपटांमधून बॉलीवूड अभिनेत्री डेझी शहाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. अभिनयाबरोबरच डेझीच्या नृत्यकौशल्याचं सर्वत्र कौतुक झालं.

अभिनय, नृत्यकौशल्याबरोबरच डेझीला रायफल शूटची फार आवड आहे. खरं तर डेझीने तिच्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत रायफल शूटची आवड जोपासली आहे.

आता ती रायफल शूटिंगच्या स्पर्धेतही सहभागी होणार आहे. ‘पॉईंट २२’ या रायफल शूटिंगच्या स्पर्धेसाठी ती सज्ज झाली आहे.

तिला नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाकडून रायफल शूटिंगचा परवानादेखील मिळाला आहे. हा परवाना मिळवणारी डेझी बॉलीवूडमधील पहिलीच अभिनेत्री आहे

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News