या कारणामुळे झाले शाहरुखचे चित्रपट हिट- सैफ अली खान

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 5 October 2019
  • बॉलिवूडमध्ये हॉलिवूडच्या अनेक कल्पना वापरल्या जातात.
  • 'आपल्या भारतीय समाजात महिलांचा पाठलाग करायची वगैरे पद्धत नाही​

मुंबई : चित्रपट सृष्टीत सैफ अली खान हा नेहमीच निडरपणे आपलं मत मांडणारा अभिनेता आहे. मग ते राजकारणाविषयी  असो किंवा सामाजिक बदलावर. अलिकडेच त्याच्या वक्तव्यामुळे सगळण्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. ते वक्तव्य त्याने शाहरुख खानसाठी केलेलं आहे. एका मुलाखतीदरम्यान 'शाहरुख खानने मुलींचा पाठलाग करुन आपली सिनेमातील कारकीर्द घडवली' असं तो म्हणाला. शाहरुख त्याच्या चित्रपटात जी पात्र निवडतो त्याविषयी तो बोलला. 

बहुतेक भारतीय चित्रपटांमध्ये अनेकदा हिरो चित्रपटातील हिरॉइनचा पाठलाग करताना दाखवला जातो. हा पाठलाग करून तो ओळख निर्माण करतो, त्यानंतर दोघं प्रेमात पडतात अशी कथा अनेकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळते. हिंदी चित्रपटात हिरॉइनची ओळख काढण्यासाठी पाठलाग करणे वगैरे या सगळ्या कल्पनांचे 'रोमँटिसिझम' करून दाखवले गेले असं सैफ म्हणाला. हिंदी चित्रपटात अशाच नायकांना संधी दिली जाते. यापुढे तो बोलला की शाहरुख खानने याच गोष्टींचा वापर करून कितीतरी चित्रपट हिट केले. 

'आपल्या भारतीय समाजात महिलांचा पाठलाग करायची वगैरे पद्धत नाही, त्यामुळे सिनेमात दाखवलेल्या या कल्पनांमूळे भारतीय नाहीत. याचा अर्थ हे सगळं बाहेरील देशातून आपल्याकडे आलंय. आपल्याकडे बॉलिवूडमध्ये हॉलिवूडच्या अनेक कल्पना वापरल्या जातात. तशीच ही असेल... 'बाझीगर'चं उदाहरण घ्यायचं झालं तर ही मूळ कथा भारतीय नाही. एका हॉलिवूडपटाची ही कथा आहे. जी आपण भारतात पुन्हा निर्माण केली. असं वक्तव्य  सैफने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलं आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News